ज्योत्स्ना दर्डा यांच्या जयंतीनिमित्त आज महाआरोग्य शिबिर

By Admin | Updated: June 18, 2016 02:19 IST2016-06-18T02:19:31+5:302016-06-18T02:19:31+5:30

लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शनिवार,

Jyotsna Darda's birth anniversary today | ज्योत्स्ना दर्डा यांच्या जयंतीनिमित्त आज महाआरोग्य शिबिर

ज्योत्स्ना दर्डा यांच्या जयंतीनिमित्त आज महाआरोग्य शिबिर

लोकमत व जैन सहेली मंडळाचे आयोजन : डॉ. दंदे फाऊंडेशनचे सहकार्य
नागपूर : लोकमत सखी मंचच्या संस्थापक अध्यक्ष श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शनिवार, दि. १८ जून रोजी महिला आणि मुलांसाठी बुटीबोरी येथील श्रीमती ज्योत्स्ना दर्डा मेमोरियल वूमन डेव्हलपमेन्ट अँड वेलफेयर सेंटर येथे नि:शुल्क महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमत आणि जैन सहेली मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आणि डॉ. दंदे फाऊंडेशनच्या सहकार्याने आयोजित या शिबिराचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येत नोंदणी केली आहे.

सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत आयोजित या शिबिरात प्रामुख्याने नेत्र रोग, अस्थि रोग, जनरल सर्जरी, मेंदू रोग, मूत्राशयाशी संबंधित रोग, प्लास्टीक सर्जरी, कर्करोग, नाक, कान, गळा, स्त्री रोग, स्तन आणि गर्भाशयाचा कर्करोग, जनरल मेडिसिन, त्वचा आणि गुप्त रोग, मनोविकार, श्वसन, क्षय रोग, ग्रंथी विकार आदी रोगांची विशेष तपासणी करण्यात येणार आहे. याशिवाय सर्व रुग्णांचे हिमोग्लोबिन, ब्लड प्रेशर, ईसीजी, ईईजी, बीएमवाई, पीएफटी, पॅप स्मीयर आदींची तपासणीही नि:शुल्क करण्यात येणार आहे. शिबिरात नोंदणी आणि अधिक माहितीसाठी शनिवारीही ेलोकमत भवन, पं. जवाहरलाल नेहरू मार्ग, रामदासपेठ येथे प्रत्यक्ष किंवा दूरध्वनी क्रमांक २४२९३५५, ९९२२९१५०३५, ९८८१७४९३९० आणि ९८२२४०६५६२ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. (प्रतिनिधी)

Web Title: Jyotsna Darda's birth anniversary today