शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

कोपऱ्यासाठी कामकाज ठप्प!

By admin | Updated: July 1, 2014 00:53 IST

गोंधळ घातला तरी निदर्शनास येऊ नये यासाठी अशा विद्यार्थ्यांना वर्गात कोपरा हवा असतो. तर हुशार विद्यार्थ्याचा प्रयत्न पुढच्या रांगेत बसण्याचा असतो. इतरांचा त्रास होऊ नये म्हणून शिक्षकही

जिल्हा परिषद : माध्यमिक शिक्षण विभागाचे गठ्ठे पडूननागपूर : गोंधळ घातला तरी निदर्शनास येऊ नये यासाठी अशा विद्यार्थ्यांना वर्गात कोपरा हवा असतो. तर हुशार विद्यार्थ्याचा प्रयत्न पुढच्या रांगेत बसण्याचा असतो. इतरांचा त्रास होऊ नये म्हणून शिक्षकही अशा विद्यार्थ्यांना पुढच्या बाकावर बसविण्याच्या प्रयत्नात असतात. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात सध्या असाच प्रकार आहे. पण इथे पुढच्या टेबलवर बसायला कुणीही तयार नाही. सर्वांना कोपऱ्यातील टेबल हवा आहे. कोपरा साधण्याच्या वादात आठ दिवसांपासून विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे. कामकाजाच्या दृष्टीने सर्व कार्यालये एकाच इमारतीत असावीत म्हणून जि.प.च्या जुन्या इमारतीमधील कार्यालये नवीन इमारतीत हलविण्यात आली. खाली झालेल्या या इमारतीत माध्यमिक शिक्षण विभागाचे कार्यालय आले. आठ दिवसांपूर्वी सामान आणण्यात आले. परंतु नवीन कार्यालयात कोपऱ्यातील टेबल मिळावा, असा बहुसंख्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचा आग्रह आहे. या वादात आठवड्यापासून फाईल्सचे गठ्ठे रस्त्यात पडून असल्याने कामकाज ठप्प आहे. संस्थाचालक, शिक्षक व विभागातील कर्मचारी कामासाठी आठवड्यापासून चकरा मारत आहे. तासन्तास प्रतीक्षा करूनही संबंधित कर्मचारी वा अधिकारी टेबलवर मिळत नाही. कोण कुढे बसतो याची माहिती मिळत नसल्याने कामानिमित्त येणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. कामकाजाच्या दृष्टीने सर्व कार्यालये एका इमारतीत आणण्याचा मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांचा प्रयत्न स्तुत्य असला तरी, त्यांच्या चांगल्या कार्यात खोडा घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. सरपंच भवन येथील कार्यालयाकडे वरिष्ठांचे फारसे लक्ष नव्हते. त्यामुळे माध्यमिक विभाग येथेच कायम असावा, असा विभागातील अधिकाऱ्यांचा प्रयत्न होता. परंतु जोंधळे यांनी तंबी दिल्यानंतर माध्यमिक विभागाचे कार्यालय जुन्या इमारतीत हलविण्यात आले. (प्रतिनिधी)