रोख रकमेसह दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:10 IST2021-01-19T04:10:57+5:302021-01-19T04:10:57+5:30

खापा : संशयित आराेपीने घरफोडी करीत रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून ...

Jewelry lamps with cash | रोख रकमेसह दागिने लंपास

रोख रकमेसह दागिने लंपास

खापा : संशयित आराेपीने घरफोडी करीत रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना खापा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील बिछवा येथे शनिवार ते रविवारी रात्रीच्या सुमारास घडली.

प्रकाश घनश्याम रामटेके (३०, रा. बिछवा, ता. सावनेर), असे संशयित आराेपीचे नाव आहे. फिर्यादी वच्छला प्रेमराज प्रजापती (३७, रा. बिछवा) व संशयित आराेपी हे दाेघेही नातेवाईक असून, त्यांच्यात घराच्या वाटणीचा वाद सुरू आहे. दरम्यान, संशयित आराेपीने फिर्यादीच्या राहत्या घराचे मागील दार ताेडून आत प्रवेश केला. घरातील कपाटाचे लाॅक ताेडून त्यातील तीन ग्रॅम साेन्याची अंगठी किंमत १० हजार रुपये व राेख १५,००० रुपये, असा एकूण २५ हजार रुपयांचा ऐवज, तसेच घरकुल रजिस्ट्रीची कागदपत्रे संशयित आराेपीने चाेरून नेली. ही बाब लक्षात येताच प्रजापती यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली. याप्रकरणी खापा पोलिसांनी भादंवि ४५७, ३८० अन्वये गुन्हा नोंदविला असून, तपास सहायक फाैजदार दीपक मानवटकर करीत आहेत.

Web Title: Jewelry lamps with cash