शहरं
Join us  
Trending Stories
1
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
2
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
5
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
6
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
7
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
8
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
9
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
10
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
11
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
13
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
14
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
15
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
16
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
17
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
18
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
19
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
Daily Top 2Weekly Top 5

जाधव चौकात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे

By admin | Updated: July 10, 2015 02:51 IST

पोलिसांच्या संरक्षणामुळे निर्ढावलेले खासगी ट्रान्सपोर्ट माफिया व त्यांनी पोसलेल्या गुंडांद्वारे गणेशपेठ मध्यवर्ती

नागपूर : पोलिसांच्या संरक्षणामुळे निर्ढावलेले खासगी ट्रान्सपोर्ट माफिया व त्यांनी पोसलेल्या गुंडांद्वारे गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकापुढील जाधव चौकात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले जात आहेत. याचा नागरिकांना प्रचंड त्रास होत असून ही गुंडशाही कोण थांबविणार, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. काही नागरिकांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला पत्र लिहिले आहे. न्यायालयाने पुढील कार्यवाही करण्यासाठी हे पत्र जनहित याचिका म्हणून स्वीकारले आहे.जाधव चौकात झोडापे, नितीन, काल्या, प्रदीप, चोपकर, नगराळे व त्यांच्या साथीदारांसह दारू भट्टीवाले, हमाली व पंक्चर दुरुस्ती यासारखे कार्य करणाऱ्यांनी गुंडगिरीद्वारे धाक निर्माण केला आहे. गेल्या १५ वर्षांत त्यांची ताकद प्रचंड वाढली आहे. या परिसरातून जाणाऱ्या महिला व तरुणींची छेड काढली जाते. विरोध करणाऱ्यांना मारहाण केली जाते. उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करून जाधव चौकात सर्रास अवैध खासगी वाहतूक सुरू आहे. गोंदिया, पवनी-लाखांदूर, ब्रह्मपुरी-वडसा, आरमोरी-गडचिरोली, अर्जुनी-साकोली, हिंगणघाट, वर्धा, वणी-वरोरा, चंद्रपूर व इतर मार्गावर धावणाऱ्या १८० ते २०० खासगी ट्रॅव्हल्स जाधव चौकातून सुटतात. ट्रॅव्हल्स मालकांनी पोसलेले गुंड २० टक्के कमिशनवर वाहतूक पोलिसांच्या डोळ्यांपुढे प्रवाशांचे अवैध बुकिंग करतात. काही गुंडांनी खासगी बस चालकांकडून प्रत्येकी ५० रुपये वसुली करून कोट्यवधी रुपयांची माया गोळा केली आहे. ही रक्कम ते गरजूंना व्याजाने कर्ज देण्यासाठी वापरतात असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणात अ‍ॅड. हरनीश गढिया यांनी न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)