शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

‘आयटीबीपी’ करणार गडचिरोलीतील नक्षलवाद्यांशी मुकाबला

By admin | Updated: November 14, 2014 00:49 IST

एकाच ठिकाणी जास्त फोर्सेस न ठेवण्याचा निर्णय भारत सरकारने घेतल्यामुळे आता गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या केंद्र’य राखीव पोलीस दलाला

संजय कौशिक : ‘सीआरपीएफ’कडे छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांचा बंदोबस्तनागपूर : एकाच ठिकाणी जास्त फोर्सेस न ठेवण्याचा निर्णय भारत सरकारने घेतल्यामुळे आता गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या केंद्र’य राखीव पोलीस दलाला (सीआरपीएफ)छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांच्या बंदोबस्तासाठी पाठविण्यात येणार आहे. गडचिरोलीतील नक्षलवाद्यांसाठी आता इंडो तिबेट बॉर्डर पोलीस तैनात करण्यात आले असून तेच नक्षलवाद्यांशी मुकाबला करतील, अशी माहिती ‘सीआरपीएफ’च्या पश्चिम सेक्टरचे महानिरीक्षक संजय कौशिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.‘सीआरपीएफ’ला ७५ वर्षे पूर्र्ण झाल्याबद्दल अमृत महोत्सव साजरा करण्यात येत असून यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संजय कौशिक म्हणाले, गडचिरोली भागातील नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्याची जबाबदारी इंडो तिबेट बॉर्डर पोलिसांकडे सोपविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यामुळे गडचिरोली भागातील ‘सीआरपीएफ’च्या जवानांना तेथून हटविणे सुरू झाले आहे. ‘सीआरपीएफ’कडे छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांच्या बंदोबस्ताची जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी मार्चपर्यंत गडचिरोलीतील सर्वच ‘सीआरपीएफ’च्या कंपन्या हलविण्यात येणार आहेत. नक्षलवाद्यांशी मुकाबला करण्यासाठी ‘सीआरपीएफ’ नेहमीच राज्यातील पोलिसांशी समन्वय साधून आपल्या कारवाया करते. सध्या ‘सीआरपीएफ’कडे गांधीनगर, नागपूर, दिल्लीत तीन महिला बटालियन असून आणखी एक महिला बटालियन सुरूकरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ‘सीआरपीएफ’मध्ये कोब्रा कंपनीच्या १० सुसज्ज कंपन्या असून त्यांच्या माध्यमातून देशात उद्भवणाऱ्या पेचप्रसंगांचा सामना करण्यात येतो. सध्या ‘सीआरपीएफ’ला हवे तेवढ्या बुलेट प्रूफ जॅकेटचा पुरवठा झाला नसून आगामी काळात लवकरच हे जॅकेट सर्वांना पुरविण्यात येतील. देशाच्या सुरक्षेसाठी मागील ७५ वर्षे ‘सीआरपीएफ’ने अविरत कार्य केले आहे. हे खूप जोखमीचे काम आहे. ब्रिटिशांच्या काळात क्राऊन रिप्रेझेंटेटिव्ह पोलीस या नावाने स्थापन झालेली फोर्स ब्रिटिशांना मदत करायची. पूर्वी फोर्सचे कार्यालय मध्यप्रदेशातील निमज येथे होते. त्यानंतर १९४९ मध्ये सरदार पटेल यांनी ‘सीआरपीएफ’ अ‍ॅक्ट तयार करून फोर्सला ध्वज प्रदान केला. देशात कुठेही पेचप्रसंग उद्भवल्यास ‘सीआरपीएफ’ची मागणी होते. यावेळी महानिरीक्षक संजय कौशिक यांच्या हस्ते बास्केटबॉल स्पर्धेतील विजेती चमू केंद्रीय रिझर्व्ह पोलीस विद्यालय नागपूर आणि उपविजेत्या सेंट झेविअर्सच्या चमूला पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी पोलीस उपमहानिरीक्षक संजय लाठकर, अखिलेश प्रसाद सिंह यांच्यासह अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन विनिता ढेकले यांनी केले. (प्रतिनिधी)२००० ‘सीआरपीएफ’ जवान शहीददेशात कुठेही तणावाचे वातावरण पसरल्यास केंद्रीय राखीव पोलीस दलाला पाचारण करण्यात येते. अतिशय कठीण परिस्थितीत जवानांना मुकाबला करायचा असतो. अशा परिस्थितीत देशातील अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी सांभाळताना ‘सीआरपीएफ’चे २००० जवान शहीद झाल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक संजय कौशिक यांनी देऊन त्यांना अभिवादन केले. याशिवाय अनेक जवानांना कर्तव्य बजावताना कायमचे अपंगत्व आले. काहींचे हात, काहींचे पाय, डोळे निकामी होऊन त्यांच्या कुटुंबीयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.