उपराजधानीतून इशान प्रयागी, नंदिनी चलाख ‘टॉप’

By Admin | Updated: June 3, 2017 21:39 IST2017-06-03T21:39:28+5:302017-06-03T21:39:28+5:30

‘सीबीएसई’च्या (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) दहावीचे निकाल शनिवारी जाहीर झाले.

Ishan Priyagi, Nandini Chikhak 'Top' | उपराजधानीतून इशान प्रयागी, नंदिनी चलाख ‘टॉप’

उपराजधानीतून इशान प्रयागी, नंदिनी चलाख ‘टॉप’

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 3 - ‘सीबीएसई’च्या (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) दहावीचे निकाल शनिवारी जाहीर झाले. यात उपराजधानीतील ‘नारायणा विद्यालयाम्’चे इशान प्रयागी व नंदिनी चलाख यांनी संयुक्तरित्या प्रथम क्रमांक पटकाविला आहे. दोघांनाही प्रत्येकी ९९.४ टक्के (४९७) गुण मिळाले. ‘टॉपर्स’मध्ये बहुतांश प्रमाणात विद्यार्थिनीच आहेत हे विशेष. 
‘सीबीएसई’तर्फे ९ मार्च ते ३० एप्रिल २०१७ या कालावधीत दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. शनिवारी दुपारी ‘सीबीएसई’च्या संकेतस्थळावर निकाल जाहीर झाला. नागपुरातून ‘सीबीएसई’ बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेला सुमारे १० हजार विद्यार्थी बसले होते. सुरुवातीला विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर ‘सीजीपीएम’नुसार (क्युमूलेटिव्ह ग्रेड पॉईन्ट अ‍ॅव्हरेज) निकाल पहायला मिळाला. त्यानंतर काही तासांनी शाळांकडे विद्यार्थ्यांचे पूर्ण गुण आले व त्यानंतर चित्र स्पष्ट झाले. 
इशान व नंदिनीपाठोपाठ नागपूरच्या बी.पी.भवन्स विद्यामंदिर (सिव्हील लाईन्स)ची विद्यार्थिनी कनक गजभिये व बी.पी.भवन्स विद्यामंदिर (श्रीकृष्णनगर) येथील विद्यार्थिनी आयुषी आंबिलकर यांनी ९९.२ टक्के (४९६) गुण प्राप्त करत संयुक्तपणे दुसरा क्रमांक पटकाविला. तिसºया क्रमांकावर ‘नारायणा विद्यालयम्’चे ऋतुजा कोलते, शिवानी पाटील, बी.पी.भवन्स विद्यामंदिर (सिव्हील लाईन्स)ची ऋषिका जोशी हे तिघे आहेत. या तिघांनाही प्रत्येकी ९९ टक्के (४९५) गुण प्राप्त झालेत. 
गुणवंतांची पसंती वैद्यकीय-अभियांत्रिकी शाखेलाच 
उपराजधानीतून पहिल्या तीन क्रमांकावर आलेल्या विद्यार्थ्यांपैकी बहुतांश जणांनी वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेलाच पसंती दिली आहे. गेल्या वर्षी गुणवंतांनी अभियांत्रिकीला जास्त प्राधान्य दिले होते. 
 

Web Title: Ishan Priyagi, Nandini Chikhak 'Top'