शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

मिहानमध्ये गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण

By admin | Updated: May 20, 2015 02:53 IST

स्वीडनचे वाणिज्य दूत (मुंबई) फ्रेड्रिका आॅर्नब्रन्ट यांनी मंगळवारी मिहान-सेझला पहिल्यांदा भेट दिली.

स्वीडनच्या वाणिज्य दूताची मिहानला भेट : सर्वेक्षणात महाराष्ट्र पुढेनागपूर : स्वीडनचे वाणिज्य दूत (मुंबई) फ्रेड्रिका आॅर्नब्रन्ट यांनी मंगळवारी मिहान-सेझला पहिल्यांदा भेट दिली. पायाभूत सुविधांची प्रशंसा करताना त्यांनी मिहानमध्ये उद्योग उभारणीसाठी पोषक वातावरण असल्याचे मत व्यक्त केले. फ्रेड्रिका यांच्यासोबत व्यवस्थापक (पीआर) मिताली करमरकर होत्या. यावेळी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (एमएडीसीचे) मुख्य अभियंते सुभाष चहांदे, एमआयएलचे महाव्यवस्थापक आबीद रुही आणि एमएडीसीचे विपणन व्यवस्थापक अतुल ठाकरे उपस्थित होते. फ्रेड्रिका म्हणाले, स्वीडिश कंपन्या गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला प्राधान्य देतात. जवळपास एक तृतीयांश कंपन्या या राज्यात आहेत. जागेचे अधिग्रहण हे मोठे आव्हान असले तरीही विस्तारीकरणासाठी इच्छुक असलेल्यांना भारतातील कंपन्यांनी नागपुरात गुंतवणूक करावी. अलीकडेच केलेल्या व्यावसायिक सर्वेक्षणात महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी उत्तम वातावरण असल्याचे म्हटले आहे. ९० टक्के स्वीडिश कंपन्यांचा भारतात गुंतवणुकीवर विश्वास आहे. स्मार्ट सिटी आणि शहरी विकासाचा भारत आणि स्वीडन या दोन्ही देशांना फायदा असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मिहानमध्ये निविदेद्वारे जमिनीची विक्रीसंचालक मंडळाने मंजूर केलेल्या धोरणानुसार महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) मिहान प्रकल्पात एसईझेडबाहेरील जमिनीची विक्री निविदेद्वारे करीत आहेत. पहिल्या दोन निविदांना प्रतिसाद न मिळाल्याने तिसऱ्यांदा जमिनीच्या विक्रीसाठी निविदा काढण्यात येणार आहे. मिहान-एसईझेडमध्ये व्यावसायिक आणि निवासी व्यवस्था व्हावी, या दृष्टीने जमीन विक्रीचा एमएडीसीचा उद्देश आहे. मिहान प्रकल्पात प्रवेश करतानाच उड्डाण पुलाच्या उजव्या बाजूला चार एकरचे तीन प्लॉट पहिल्यांदा फेब्रुवारीमध्ये विक्रीस काढले. ५ हजार रुपये चौरस मीटर बेस प्राईस रेट आणि एक एफएसआय ठेवून निविदा बोलविण्यात आल्या. निविदा आल्या पण त्या एमएडीसीच्या अपेक्षानुसार नव्हता. त्यामुळे एप्रिलमध्ये याच प्लॉटसाठी पुन्हा निविदा काढण्यात आल्या. तेव्हा बेस प्राईस रेट ६५०० रुपये चौरस मीटर आणि दीड एफएसआय ठेवण्यात आला होता. त्यावेळीही अपेक्षेनुसार कंपन्या आल्या नाहीत. त्यामुळे या जमिनीसाठी पुन्हा निविदा काढण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.