शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांच्या आंतरराज्यीय टोळीचा छडा

By admin | Updated: November 20, 2015 03:18 IST

एका दिवसात १० ते १५ घरफोड्या करून दररोज लाखोंचा ऐवज चोरणारी आंतरराज्यीय टोळी हुडकेश्वर पोलिसांनी पकडली.

दिल्लीचे दोन चोरटे गजाआड : म्होरक्यासह दोघे फरारनागपूर : एका दिवसात १० ते १५ घरफोड्या करून दररोज लाखोंचा ऐवज चोरणारी आंतरराज्यीय टोळी हुडकेश्वर पोलिसांनी पकडली. टोळीतील एका महिलेसह दोघांना अटक करून रोख आणि दागिन्यांसह आठ लाखांचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला. ही टोळी दिल्लीची असून, टोळीच्या म्होरक्यासह दोघे मात्र पळून गेले. त्यांना आम्ही लवकरच जेरबंद करू, असा विश्वास पोलीस उपायुक्त ईशू सिंधू यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.हुडकेश्वरमध्ये अवघ्या दोन दिवसात आठ घरफोड्या झाल्यामुळे पोलीस हैराण झाले होते. या घरफोडीत सहभागी चोरट्यांकडून पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ वापरली जात असल्याचे आणि त्यात एक महिलासुद्धा असल्याची माहिती पोलिसांना कळली. त्यावरून ठाणेदार राजा पवार आणि त्यांचे सहकारी कामी लागले. बुधवारी दुपारी उदयनगर चौकाकडे पांढऱ्या रंगाची स्कॉपिओ (एमएच ३१/ डीव्ही ७४२९) जात होती. त्यात तीन पुरुष आणि एक महिला दिसल्याने पोलिसांनी उदयनगर चौकातील सिग्नलवर स्कॉर्पिओ थांबवली. ते पाहून कारमधील दोघांनी खाली उड्या मारून पळ काढला. एका महिलेसह दोघे मात्र पोलिसांच्या हाती लागले. दोघे पळून गेल्यामुळे संशय अधिक गडद झाला. त्यामुळे या दोघांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली. प्रारंभी असंबंद्ध माहिती देणाऱ्या या दोघांनी नंतर मात्र आपली आणि पळून गेलेल्या साथीदारांची नावे सांगून सात घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. अमित दर्यावसिंग पवार (वय २८,रा.जोहरीपूर,सिकंदराबाद,दिल्ली)आणि प्रियंका सहदेवसिंग ठाकूर (वय २७,रा.सुलेमाननगर, अमनविहार, दिल्ली) अशी पकडण्यात आलेल्या तर, इकराम ऊर्फ समीर गनी आणि मोबीन अशी पळून गेलेल्या चोरट्यांची नावे आहेत. (प्रतिनिधी)