चोरट्यांच्या आंतरराज्यीय टोळीचा नागपूर स्थानकावर हैदोस, एकाच दिवशी ९ चोऱ्या; काही तासांतच रेल्वे पोलिसांनी बांधल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 22:57 IST2026-02-09T22:56:34+5:302026-02-09T22:57:03+5:30

​​​​​​​दक्षिण एक्स्प्रेस, पुरी अहमदाबाद एक्स्प्रेस या दोन गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या गोंदिया, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश येथील प्रवाशांचे तब्बल ८ मोबाईल या टोळीने चोरले. त्यानंतर एका प्रवाशाला नागपूर स्थानकाच्या गेटजवळ झोपलेला असताना त्याचाही मोबाईल लंपास केला. एकापाठोपाठ मोबाईल चोरीच्या तक्रारी मिळू लागल्याने रेल्वे पोलिस हैराण झाले.

Interstate gang of thieves raids Nagpur station, 9 thefts in a single day; Railway police arrests them within hours | चोरट्यांच्या आंतरराज्यीय टोळीचा नागपूर स्थानकावर हैदोस, एकाच दिवशी ९ चोऱ्या; काही तासांतच रेल्वे पोलिसांनी बांधल्या मुसक्या

चोरट्यांच्या आंतरराज्यीय टोळीचा नागपूर स्थानकावर हैदोस, एकाच दिवशी ९ चोऱ्या; काही तासांतच रेल्वे पोलिसांनी बांधल्या मुसक्या



नागपूर : विविध प्रांतांतील रेल्वे स्थानकं तसेच रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांचे मोबाईल आणि माैल्यवान चीजवस्तू लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा शासकीय रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) भंडाफोड केला असून, या टोळीतील विविध प्रांतांतील ९ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून नऊ चोरीचे मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत. ३ महिलांसह ९ आरोपींचा समावेश असलेली ही टोळी रेल्वेगाड्या आणि रेल्वे स्थानकावर चोऱ्या करण्यासाठी कुख्यात आहे. रविवारी (दि.८) सकाळी नागपुरात आलेल्या या टोळीने सकाळपासून रात्रीपर्यंत नागपूर स्थानकावर अक्षरश: हैदोस घातला.

दक्षिण एक्स्प्रेस, पुरी अहमदाबाद एक्स्प्रेस या दोन गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या गोंदिया, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश येथील प्रवाशांचे तब्बल ८ मोबाईल या टोळीने चोरले. त्यानंतर एका प्रवाशाला नागपूर स्थानकाच्या गेटजवळ झोपलेला असताना त्याचाही मोबाईल लंपास केला. एकापाठोपाठ मोबाईल चोरीच्या तक्रारी मिळू लागल्याने रेल्वे पोलिस हैराण झाले. एकाच दिवशी चोरट्यांनी हैदोस घातल्याची माहिती कळताच पोलिस अधीक्षक मंगेश शिंदे, अप्पर अधीक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय अधिकारी पांडुरंग सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी गौरव गावंडे तसेच आरपीएफचे निरीक्षक के. के. अंबावत यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे पोलिस, गुन्हे शाखा, आरपीएफ नागपूर आणि सीपीडीएसच्या पथकांनी संयुक्तपणे तपास सुरू केला.

सीसीटीव्हीच्या पाहणीतून आरोपी नजरेत आले. त्यांचा माग काढून त्यांना रविवारी रात्री कलम ३०३(२), ३(५) बीएनएस अन्वये अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीचे ९ मोबाईलही जप्त करण्यात आले. पकडण्यात आलेले आरोपी छत्तीसगड, बिहार आणि झारखंडमधील रहिवासी आहे. ते विविध रेल्वे गाड्यांमध्ये आणि विविध प्रांतात अशाच संघटित पद्धतीने चोरीच्या घटना घडवून आणत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

अशी आहेत आरोपींची नावे
एस जया एस सिनू (वय ३०, रा. भिलाई, जि. दुर्ग, छत्तीसगड), एस इंदुपती एन वसंत (३२, रा. भिलाई), सुमलता गणेश सुन्नी (३५, रा. भिलाई), जे पवन जे बडेसाहब (२०, रा. भिलाई), एस सुमा एस सुरेश (३०, रा. सुंदर नगर वेलांगणी माता मरिन चर्चजवळ, भिलाई), डी रोहित डी जोशी (१८, रा. भिलाई), जी राहुल जी शेखर (१८, रा. दुर्ग), राकेश कुमार कुलेश्वर राणा (३०, रा तिलीया थाना खोरी, जि. चित्रा, झारखंड), मोहम्मद रियाज मोहम्मद वजीर (३२, रा. बहांत जि. दरभंगा, बिहार).
 

 

Web Title : नागपुर स्टेशन पर अंतरराज्यीय चोर गिरोह का भंडाफोड़; नौ गिरफ्तार

Web Summary : नागपुर स्टेशन पर एक अंतरराज्यीय चोर गिरोह का भंडाफोड़ हुआ। रेलवे पुलिस ने तीन महिलाओं सहित नौ लोगों को गिरफ्तार किया और चोरी के मोबाइल फोन बरामद किए। गिरोह ने ट्रेनों और स्टेशन पर यात्रियों को निशाना बनाया, जो विभिन्न राज्यों के यात्रियों को लूटते थे। कई चोरी की शिकायतों के बाद पुलिस ने त्वरित कार्रवाई की।

Web Title : Interstate Thief Gang Busted at Nagpur Station; Nine Arrested

Web Summary : An interstate gang of thieves was busted at Nagpur station. Railway police arrested nine individuals, including three women, recovering stolen mobile phones. The gang targeted passengers on trains and at the station, preying on travelers from various states. Police acted swiftly following multiple theft complaints.