शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

दीक्षाभूमीचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सौंदर्यीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 10:00 PM

नागपुरातील प्रसिद्ध व पवित्र दीक्षाभूमी हे ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळ असून, लाखो अनुयायी या स्थळाला भेट देण्यासाठी येत असतात. ते पाहता दीक्षाभूमीचा आंतरराष्ट्रीय दर्जानुुसार विकास व सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या कामासाठी नासुप्रने १०० कोटींचा प्रस्ताव तयार केला असून, लवकरच तो शासनाकडे पाठवून त्यासंदर्भात उच्चस्तरीय बैठकी घेतल्या जाणार आहेत.

ठळक मुद्देपालकमंत्री बावनकुळे : १०० कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर होणार

लोकमत न्यूज  नेटवर्क नागपूर : नागपुरातील प्रसिद्ध व पवित्र दीक्षाभूमी हे ‘अ’ वर्ग पर्यटन स्थळ असून, लाखो अनुयायी या स्थळाला भेट देण्यासाठी येत असतात. ते पाहता दीक्षाभूमीचा आंतरराष्ट्रीय दर्जानुुसार विकास व सौंदर्यीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या कामासाठी नासुप्रने १०० कोटींचा प्रस्ताव तयार केला असून, लवकरच तो शासनाकडे पाठवून त्यासंदर्भात उच्चस्तरीय बैठकी घेतल्या जाणार आहेत.पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या प्रस्तावाला अंतिम रूप देण्यासाठ़ी मुख्य सचिव व मुख्यमंत्रीस्तरावर बैठका घेण्यात येतील. सौंदर्यीकरण व विस्तारीकरणाबाबत भाग-१ चा हा प्रस्ताव असून, टप्प्याटप्प्याने अन्य भागांचे काम करण्यात येणार आहे. विकास आराखड्याची जबाबदारी नासुप्रकडे देण्यात आली असून, मे. डिझाईन असोसिएट्स इन्कॉपोर्रेशन नोएडा यांची या प्रकल्पासाठी सल्लागार वास्तुविशारद म्हणून २०१६ मध्ये नियुक्ती झाली आहे. या कंपनीने डॉ. आंबेडकर स्मारक समितीच्या २२.४ एकर जागेवरील प्रकल्पाचा विकास आराखडा तयार केला आहे. त्यानुसार १०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.या कामांमध्ये व्यासपीठ, दगडी सुरक्षा भिंतीचे बांधकाम, सुरक्षा रक्षक, पहारेकरी खोली, टेहळणी मनोरा, प्रवेशद्वार, नियंत्रण कक्ष, अनामत कक्ष, प्रथमोपचार कक्ष, संग्रहालय, अर्थकेंद्र, व्यावसायिक संकुल, खुले सभागृह, दगडी परिक्रमा, दगडी पथ, अनुयायांसाठी सुविधा क्षेत्र, प्रसाधने, पिण्याच्या पाण्याची सविधा, विद्युतीकरण, सौर ऊर्जा यंत्रणा, मुख्य स्तुपाच्या प्रवेशद्वाराचे नूतनीकरण, आॅडिओ सिस्टिम, किरकोळ कामे आदींचा समावेश करण्यात आला आहे.गोंडवाना संग्रहालय गोरेवाड्यातआदिवासींचे गोंडवाना संग्रहालय (म्युझियम) गोरेवाड्यात स्थानांतरित करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. गोंडवाना संग्रहालयासाठी शासनाने २४ कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहे. पण चार वर्षांपासून जागा उपलब्ध झाली नाही. गोरेवाड्यात जागा उपलब्ध होणार असल्यामुळे आता गोरेवाडा येथे हे संग्रहालय करण्यात येणार आहे.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीnagpurनागपूर