शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा कोणत्याही कराराविना चीन दौरा संपला; इराण युद्धावर तोडगा निघालाच नाही
2
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
3
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
4
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
5
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
6
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
7
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
8
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
9
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
10
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
11
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
12
लेख: ‘द ग्लिनर्स’- इतक्या साध्या चित्रात खास असं नेमकं काय आहे?
13
विशेष लेख: ‘फॅशन’ उद्योजक खऱ्या कलाकारांची ‘किंमत’ करतात का?
14
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
15
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
16
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
17
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
18
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
19
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
20
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक चोरांची आंतरराज्यीय टोळी जाळ्यात

By admin | Updated: May 16, 2014 00:06 IST

ट्रकची चोरी करून दुसर्‍या राज्यात त्याची विल्हेवाट लावणार्‍या आंतरराज्यीय टोळीला गोंदियातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे. या टोळीतील चौघांना रंगेहाथ पकडून बिलासपूर

चौघांना अटक, ट्रक जप्त : गोंदिया एलसीबीची कारवाई

गोंदिया : ट्रकची चोरी करून दुसर्‍या राज्यात त्याची विल्हेवाट लावणार्‍या आंतरराज्यीय टोळीला गोंदियातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे. या टोळीतील चौघांना रंगेहाथ पकडून बिलासपूर (छत्तीसगड) येथून त्यांनी चोरून आणलेला ट्रक जप्त करण्यात आला.

ट्रक चोरीच्या अनेक घटना गोंदिया जिल्ह्यात बर्‍याच दिवसांपासून घडत आहेत. मात्र चोरटे पोलिसांच्या हाती लागत नसल्यामुळे त्यांचा शोध घेण्याचे काम पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे (एलसीबी) दिले होते. त्या आधारे पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर यांनी आपल्या पद्धतीने तपासाचे चक्र फिरविले.

यात त्यांना ट्रक चोरीच्या कारवायांत आंतरराज्यीय टोळीचा हात असल्याचे व ही टोळी शहरात दाखल होणार असल्याची माहिती खबर्‍यांकडून मिळाली. त्या आधारे पोलिसांचे पथक दोन दिवस या टोळीच्या मागावर होते.

दरम्यान १३ मे रोजी मध्यरात्री आमगाव मार्गावरील बम्लेश्‍वरी मंदिराजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रक (सीजी 0४/ जे ५१७५) वर या पथकाला संशय आल्याने त्यांनी ट्रकच्या कॅबीनमध्ये असलेल्या लोकांना विचारपूस केली. यावेळी ट्रकमध्ये बलदेवसिंग तारासिंग खैरा (५२, रा.टेकानाका, नागपूर), प्रगटसिंग इकबालसिंग जाट (४३,रा. रमदास, पंजाब), परमेंद्र टहेलसिंग जाट (२८,रा. जब्बोवाल, पंजाब), राजगीरसिंग जितसींग जाट (२९, रा.मेहता चौक, पंजाब) हे होते. त्यांना ट्रकचे कागदपत्र मागितले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

त्यामुळे सदर पथकाने ट्रकची बारकाईने माहिती काढली असता सदर ट्रकचा खरा क्रमांक सीजी १२/ एस ३३२२ असल्याचे त्यांना कळले.

या आरोपींनी बिलासपूर येथील बायपास मार्गावर चालकाला मारहाण करून बनावट क्रमांकाची प्लेट चोरून आणल्याचे कळले. याबाबत पोलीस ठाणे कोनी (बिलासपूर) येथे गुन्हा दाखल असल्याने पथकाने १२ लाख रूपये किमतीचा तो ट्रक जप्त केला. तसेच चारही आरोपींना अटक केली. त्यांची विचारपूस सुरू असून आणखीही ट्रक चोरीच्या काही घटना त्यांच्याकडून उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वतर्विली आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक भांडारकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण नावडकर, सहायक फौजदार नवखरे, हवालदार शंकर साठवणे, हवालदार अर्जुनी कावळे, संतोष काळे, नायक शिपाई अजय सवालाखे, धनंजय शेंडे, भुवनलाल देशमुख, तुळसीदास लुटे, रेखलाल गौतम, राजकुमार खोटेले, नितीन जाधव, पोलीस शिपाई विजय शेंडे, चालक सयाम यांनी यशस्वी केली. (शहर प्रतिनिधी)