शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

बुकींच्या निवासस्थान व प्रतिष्ठानाची तपासणी : अन्य शहरातील बुकींशी हितसंबंध

By admin | Updated: July 15, 2015 03:33 IST

क्रिकेटवर जुगार खेळणाऱ्या उपराजधानीतील एका नामांकित बुकीचे रामदासपेठेतील निवासस्थान आणि गांधीबाग येथील ...

ईडीची नागपुरातही धडक नागपूर : क्रिकेटवर जुगार खेळणाऱ्या उपराजधानीतील एका नामांकित बुकीचे रामदासपेठेतील निवासस्थान आणि गांधीबाग येथील व्यावसायिक प्रतिष्ठानावर सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अन्वेषण विभागाने मंगळवारी धाड टाकली. बुकीच्या दोन्ही ठिकाणांवर सकाळी १० वाजता एकाचवेळी ही कारवाई सुरू झाली. कारवाई रात्रीपर्यंत सुरू होती. धाडीची माहिती देण्यासाठी ‘ईडी’चे अधिकारी उपलब्ध होऊ शकले नाहीत. धाडीची कारवाई सक्तवसुली संचालनालयाच्या मुंबई कार्यालयातील प्रत्येकी सहा सदस्यीय दोन चमूने केली. न्या. आर.एम. लोढा कमिटीने मंगळवारी दिलेल्या निर्णयाशी संबंधित ही धाड असल्याचे बोलले जात आहे. या समितीने चेन्नई सुपर किंग (सीएसके) आणि राजस्थान रॉयल (आरआर) क्रिकेट टीमवर दोन वर्षांसाठी बंदी टाकली, शिवाय या दोन्ही चमूचे मालक गुरुनाथ मयप्पन आणि राज कुंद्रा यांच्यावर भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाच्या भारतीय प्रीमिअर लीग (आयपीएल) क्रिकेट सामन्यात सहभागी होण्यावर आजन्म बंदी टाकली. न्या. लोढा हे मुंबईत भरगच्च पत्रपरिषदेत समितीचा निर्णय जाहीर करीत होते तर दुसरीकडे ‘ईडी’चे अधिकारी नागपुरात धाडीची कारवाई करीत होते. नागपुरातील बुकी हा नामांकित सट्टाकिंग आहे. मुंबई, इंदूर, दिल्ली, कानपूर, कोलकाता आणि देशातील अन्य शहरातील बुकींसोबत त्याचे हितसंबंध आहेत. या बुकीने मध्य भारतात सट्ट्याच्या माध्यमातून येणारा पैसा गोळा करण्यासाठी आपले एजंट नेमले आहेत. त्याचे नेटवर्क ओडीआय, आयपीएल आणि २०-टष्ट्वेन्टी सामन्यादरम्यान सक्रिय असते. सामनेच नव्हे तर स्पॉट फिक्सिंवरही ते सट्टा खातात. या व्यवसायातील अन्य बुकींनी सांगितले की, हे एजंट छोट्या शहरातील ग्राहकांकडून खायवाडी करून नागपुरातील या बुकीकडे नोंद (उतारी) करतात. नागपुरातील बुकीला जोखीम वाटली तर तो अन्य शहरातील मोठ्या बुकींकडे येथील सट्ट्याची नोंद करतो. बुकीचा हा व्यवसाय मोठ्या संख्येने उपलब्ध असलेले मोबाईल फोन आणि ई-मेलच्या माध्यमातून करतात. पण पैशाची देवाणघेवाण ही नेहमीच हवालाच्या माध्यमातून करण्यात येते. सामन्याचा निर्णय येताच पैज लावणाऱ्याला त्वरित भुगतान केले जाते. या अवैध धंद्यामध्ये विश्वासार्हता येण्यासाठी प्रत्येक सौद्याचे भुगतान अतिशय प्रामाणिकपणे केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.(प्रतिनिधी)