शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

भारतात उद्योजकांसाठी असंख्य संधी

By admin | Updated: August 9, 2015 02:41 IST

विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी(व्हीएनआयटी) च्या व्हीएनआयटी अ‍ॅल्युम्नी असोसिएशनतर्फे ..

राजन जसवा : व्हीएनआयटीत उद्योजकता अभ्यासक्रमाचे उद्घाटननागपूर : विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी(व्हीएनआयटी) च्या व्हीएनआयटी अ‍ॅल्युम्नी असोसिएशनतर्फे यावर्षीपासून उद्योजकता अभ्यासक्रमाला (इन्ट्रोडक्शन आॅफ एन्टरप्रिनरशीप) सुरुवात करण्यात आली असून उद्योग जगतातील मान्यवरांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात या नवीन अभ्यासक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.अभ्यासक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी सिलिकॉन व्हॅलीतील उद्योजक राजन जसवा, व्हीएनआयटी बोर्ड आॅफ गव्हर्नन्सचे अध्यक्ष विश्राम जामदार, व्हीएनआयटीचे संचालक डॉ. एन.एस. चौधरी, व्हीएनआयटी अ‍ॅल्युम्नी असोसिएशनचे चेअरमन शशी चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते. उद्योजकता अभ्यासक्रम हे व्हीएनआयटी अ‍ॅल्युम्नी असोसिएशनचे मूल आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मुंबई आयआयटीमध्ये याच अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना वर्षभरापासून शिकविणारे राजन जसवा यांनी व व्हीएनआयटीच्या माजी विद्यार्थ्यांनी मिळून हा अभ्यासक्रम तयार केला आहे. यावेळी बोलतांना राजन जसवा म्हणाले, भारतात नवे उद्योग सुरू करण्याच्या असंख्य संधी आहेत. इतर आयआयटीयन्समध्ये या अभ्यासक्रमाबाबत उत्सुकता आहे. पहिले वर्ष असल्याने केवळ ६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असून यातील १० टक्के तरी उद्योग स्थापन करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विश्राम जामदार यांनी व्हीएनआयटी अ‍ॅल्युम्नी असोसिएशनने एक चांगली सुरुवात केली असून आपल्याला विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची इच्छा व्यक्त केली तर व्हीएनआयटीचे संचालक डॉ. एन.एस. चौधरी यांनी अभ्यासक्रमाच्या यशस्वीतेसाठी हवी ती मदत करण्याचे आश्वासन दिले. प्रास्ताविक करताना शशी चौधरी म्हणाले, आजचा काळ हा टेक्नॉलॉजीपूरक उद्योजकांचा काळ आहे. त्यामुळे काळानुसार कुशल उद्योजकांची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. व्हीएनआयटीतील या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना राजन जसवा यांच्यासह देशातील अग्रगण्य उद्योजकांचे मार्गदर्शन लाभणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.कार्यक्रमाला व्हीएनआयटी अ‍ॅल्युम्नी असोसिएशनचे अध्यक्ष उदय कामत, जोगींदरसिंग सोंद, अशोक अगरवाल, दिलीप कामदार, प्रमोद पाम्पटवार, डॉ. अरविंद कुमार पाटील, सुनील सिर्सिकर, पंकज भाविषी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुनील भट यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. राघवेंद्र देशमुख यांनी केले. कार्यक्रमासाठी अनिल ठक्कर व अभिजित हरदास यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)