शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

अमानूष; उशीर झाल्याच्या कारणावरून विद्यार्थिनीला २०० उठाबशांची शिक्षा; प्रकृती खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 11:43 IST

Nagpur News एका ‌‘शिक्षकमित्र’ तरुणीने चौथ्या वर्गातील विद्यार्थिनीला हातावर छड्या आणि तब्बल २०० उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. त्यामुळे चिमुकलीची प्रकृती खालावली आहे.

ठळक मुद्दे मुख्याध्यापकासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

 

 लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर: कोरोना संसर्गामुळे शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यावर पर्याय म्हणून शहरात ऑनलाईन वर्ग सुरू झाले. ग्रामीण भागात मात्र इंटरनेट नेटवर्क फेल ठरले. त्यामुळे ग्रामपंचायतीने गावातीलच शिक्षित तरुणांची ‘शिक्षकमित्र’ म्हणून निवड करत अध्यापन सुरू केले. मात्र हेच खाजगी ‘शिक्षकमित्र’ (स्वंयसेवक) आता विद्यार्थ्यांच्या जिव्हारी आणि शिक्षण विभागाच्या अंगलट आले आहे. कारण एका ‌‘शिक्षकमित्र’ तरुणीने चौथ्या वर्गातील विद्यार्थिनीला हातावर छड्या आणि तब्बल २०० उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. त्यामुळे चिमुकलीची प्रकृती खालावली आहे. याप्रकरणी मुख्याध्यापक, वर्गशिक्षक व शिक्षकमित्र तरुणी अशा तिघांविरुद्ध पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.            मुख्याध्यापक पांडुरंग बुचे, वर्गशिक्षक राजेश चौधरी व शिक्षकमित्र आँचल मंगेश कोकाटे (२१), अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तालुक्यातील महालगाव येथे जिल्हा परिषदेची उच्च प्राथमिक शाळा आहे. कोरोना संसर्गामुळे शाळा बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पर्यायी अध्यापनाचा मार्ग स्वीकारत महालगाव ग्रामपंचायतीने इयत्ता १ ते ७ पर्यंतसाठी गावातीलच शिक्षित सात तरुणांची खाजगी ‘शिक्षकमित्र’ म्हणून निवड केली. याबाबत ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीने मासिक सभेत स्वतंत्र ठराव घेतला. त्यानुसार हे सेतूवर्ग शिक्षक मित्राच्या घरी कोविड नियमावलीचे पालन करून सुरू करण्यात आले. इयत्ता ४ थ्या वर्गाची जबाबदारी आँचल मंगेश कोकाटे या शिक्षक मित्राकडे होती.

९ जुलै रोजी ही विद्यार्थिनी सदर शिक्षक मित्राच्या घरी भरलेल्या सेतू वर्गात गेली असता, उशीर झाल्याच्या कारणावरून आँचल कोकाटे या खाजगी शिक्षिकेने चिमुकलीच्या हातावर छड्यांचा मार देत, २०० उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. त्यामुळे चिमुकलीला शारीरिक त्रासासह मानसिक धक्का बसला. झोपणे, उठणे, श्वास घेणेसुद्धा कठीण झाले आहे. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी चिमुकलीला मानसिक धक्का बसल्याचे सांगितले. याबाबत चिमुकलीचे पालक कपिल वामन मून रा. महालगाव यांनी बेला पोलीस स्टेशनसह मुख्य कार्यकारी अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे शाळेतील सहा शिक्षकांसह खाजगी शिक्षक मित्राविरुद्ध गत २० जुलै रोजी तक्रार केली. दरम्यान, बुटीबोरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र चौहान, बेला येथील ठाणेदार पंकज वाघाडे यांनी शुक्रवारी महालगाव येथे जाऊन चौकशी केली. त्यानंतर मुख्याध्यापक, शिक्षक व खाजगी शिक्षक अशा तिघांविरुद्ध बेला पोलीस स्टेशनमध्ये कलम ७५ बाल न्याय अधिनियम २०१५, सहकलम ३५२, ३२५, ५०६ (१) १८८, १०९ भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

तज्ज्ञाकडे उपचार सुरू

४ थ्या वर्गात शिकणारी ही विद्यार्थिनी अंदाजे ९ ते १० वर्षांची आहे. हातावर छडीचा मार आणि २०० उठाबशा हा प्रकार धक्कादायक आहे. त्यामुळे चिमुकलीला शारीरिक त्रास तर होतच आहे, सोबतच कोवळ्या वयात शिक्षा झाल्यामुळे तिला जबर मानसिक धक्कासुद्धा बसला आहे. त्यामुळे झोपेतून अचानक उठणे, छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास यामुळे ती पूर्णत: घाबरली आहे. प्रारंभी तिला सिर्सी येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर हिंगणघाट, सेवाग्राम व आता नागपूर येथील मेंदूरोग तज्ज्ञांकडे उपचार सुरू आहेत.---

याप्रकरणी विद्यार्थिनीच्या पालकांनी पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली आहे. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र चौहान व मी स्वत: आज महालगाव येथे जाऊन चौकशी केली. तपासाअंती मुख्याध्यापक, शिक्षक व खाजगी शिक्षक या तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. तपास सुरू आहे. यात आणखी कुणी दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल.- संजय वाघाडे, ठाणेदार बेला

-----लॉकडाऊमुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन खाजगी ‘शिक्षकमित्रां’ची निवड केली. सदर प्रकाराबाबत कळताच मी गुरुवारला महालगाव शाळेला व मुलीच्या घरी भेट दिली. मात्र ती हिंगणघाट येथे दवाखान्यात असल्यामुळे पालकांशी भेट झाली नाही.

- विजय कोकोडे, प्रभारी गट शिक्षणाधिकारी भिवापूर

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र