कुख्यात गुंडाचा खून

By Admin | Updated: June 9, 2015 02:49 IST2015-06-09T02:49:10+5:302015-06-09T02:49:10+5:30

मोमीनपुरा येथील कुख्यात गुन्हेगार शेख जुम्मन (३४) याचा सोमवारी जरीपटका हद्दीतील पंजाबी लाईनस्थित भैंसासूर

The infamous punk murder | कुख्यात गुंडाचा खून

कुख्यात गुंडाचा खून

नागपूर : मोमीनपुरा येथील कुख्यात गुन्हेगार शेख जुम्मन (३४) याचा सोमवारी जरीपटका हद्दीतील पंजाबी लाईनस्थित भैंसासूर मैदानात गळा कापून खून करण्यात आला. मृत हा कुख्यात गुन्हेगार असून गार्ड लाईन येथील चर्चित दुहेरी हत्याकांडातील तो आरोपी असल्याचे सांगितले जाते.
दुहेरी हत्याकांडापासून शेख जुम्मन हा मोमीनपुरा सोडून यशोधरानगर येथील माजरी झोपडपट्टीत राहायला गेला होता. सोमवारी सायंकाळी ५ वाजता पोलिसांना खुनाची माहिती मिळाली. त्याचा गळा कापून मृतदेह झुडपात फेकला होता. काही जण शौचासाठी मैदानातील झुडपात गेले असता त्यांना मृतदेह आढळून आला. पोलिसांनी विचारपूस करण्यासाठी पंजाबी लाईन येथील करिया, गड्डीगोदाम येथील डामनिक, बंडू आणि त्याचे दोन साथीदार यांच्यासह पाच जणांना ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत विचारपूस सुरू आहे. सूत्रांनुसार जुम्मन हा जुगार खेळण्यासाठी कुख्यात असलेल्या भैंसासूर मैदानात नेहमीच येत असे. या मैदानात कुख्यात गुंडा करियासुद्धा आपल्या साथीदारासोबत जुगार अड्डा चालवीत होता.
जुम्मनची करिया व त्याच्या साथीदारांसोबत मैत्री होती. त्यामुळे तो नेहमीच गड्डीगोदाम परिसरात फिरत होता. सोमवारी सकाळी तो करिया व त्याच्या साथीदारांसोबतच फिरत होता. कामठी रोडवरील एका दारूच्या दुकानातही ते गेले होते. दुपारपर्यंत सर्वजण दारू पित होते. त्यानंतर सर्वजण पंजाबी लाईनकडे निघून गेले. त्यानंतर सायंकाळी जुम्मनचा खून झाल्याची बातमी पसरली.

Web Title: The infamous punk murder