शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा न्यायालयात सुरक्षा सुविधा वाढवा

By admin | Updated: February 12, 2016 03:31 IST

जिल्हा न्यायालय इमारतीत सुरक्षा सुविधा वाढविण्याचे निर्देश उच्च न्यायालयाचे न्या. भूषण गवई आणि न्या. प्रदीप देशमुख यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले.

हायकोर्ट : राज्य सरकारला निर्देशनागपूर : जिल्हा न्यायालय इमारतीत सुरक्षा सुविधा वाढविण्याचे निर्देश उच्च न्यायालयाचे न्या. भूषण गवई आणि न्या. प्रदीप देशमुख यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले. न्यायमंदिर इमारतीमध्ये सुविधांचा अभाव असून त्या उपलब्ध करण्याची मागणी करणारी जनहित याचिका जिल्हा वकील संघटनेचे (डीबीए) माजी सचिव अ‍ॅड. मनोज साबळे यांनी दाखल केली होती. ही याचिका गुरुवारी सुनावणीस आली असता न्यायालयाने राज्य सरकारला दोन आठवड्यात शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले. याचिकेनुसार न्यायमंदिर इमारत १९७६ साली बांधण्यात आली होती. त्यावेळी केवळ ६०० वकील न्यायालयात वकिली करायचे. आता ही संख्या सहा हजाराच्या वर गेली आहे. प्रलंबित प्रकरणांची आणि न्यायाधीशांची संख्याही वाढली आहे. उपलब्ध सुविधा अपुऱ्या पडत आहेत. सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी मेटल डिटेक्टर, सीसीटीव्ही कॅमेरे, बॅग स्कॅनर आदी अत्याधुनिक उपकरणे बसविण्याची आवश्यकता आहे. सध्या केवळ मेटल डिटेक्टर असून एवढी सुविधा पुरेशी नाही, असे याचिकेत नमूद आहे. नागपूर जिल्ह्यातील जिल्हा व तालुकास्तरातील न्यायालय इमारतींच्या विकासाकरिता धोरण निश्चित करण्यासाठी न्यायाधीश आणि वकिलांची समिती स्थापन करण्यात यावी, उच्च न्यायालय वकील संघटना, जिल्हा वकील संघटना आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील न्यायालय इमारतींचे निरीक्षण करावे, आवश्यक सुविधांचा अहवाल सादर करावा, जिल्हा न्यायालयाच्या पूरक इमारतीच्या बांधकामाच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेण्यात यावा, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांसोबत चर्चा करून सुयोग इमारत परिसरातील मोकळ्या जागेवर न्यायालय व वकिलांसाठी अतिरिक्त बांधकाम करण्यात यावे, सध्या अस्तित्वात असलेले नॅशनल फायर कॉलेज काटोल रोडवरील इमारतीमध्ये स्थानांतरित करून ही जागा न्यायालयासाठी दिली जाऊ शकते, अशी विनंतीही याचिकाकर्त्याने केली. या याचिकेवर यापूर्वी उच्च न्यायालयाने केंद्रीय नगरविकास सचिव, गृह विभागाचे सचिव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव, गृह सचिव, हायकोर्ट बार असोसिएशन आणि जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षांना नोटीस बजावली होती. न्यायालयात याचिकाकर्त्याच्या वतीने अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर, सरकारच्या वतीने मुख्य सरकारी वकील भारती डांगरे आणि केंद्र सरकारच्या वतीने अ‍ॅड. मुग्धा चांदूरकर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)