शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
3
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
4
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
5
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
6
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
7
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
8
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
9
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
10
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
11
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
12
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
13
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
14
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
15
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
16
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
17
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
18
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
19
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी साझाच्या संख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2016 03:04 IST

तलाठी साझांची पुनर्रचना व राज्यातील महसूल मंडळांच्या पुनर्रचनेबाबत विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्य

तब्बल ४० वर्षानंतर वाढ : मंत्रिमंडळाची तत्त्वत: मंजुरीनागपूर : तलाठी साझांची पुनर्रचना व राज्यातील महसूल मंडळांच्या पुनर्रचनेबाबत विभागीय आयुक्त अनुप कुमार यांच्य अध्यक्षतेखाली महसूल विभागाने एक अभ्यासगट समिती गठित केली होती. या समितीने आपला अहवाल शासनास सादर केला आहे. या समितीच्या अहवालातील वाढीव तलाठी साझा व मंडळ अधिकारी कार्यालये निर्मितीविषयीच्या शिफारशींना मंत्रिमंडळाने तत्त्वत: मान्यता दिली आहे. यानुसार राज्यातील तलाठी साझाचे एकूण संख्या ३,०८४ ने वाढणार आहे. तब्बल ४० वर्षानंतर ही वाढ करण्यात आली असून यामुळे तलाठ्यांची संख्याही वाढणार आहे. या समितीचे अध्यक्ष विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी बुधवारी यासंदर्भात पत्रकारांना माहिती दिली. त्यांनी सांगितले, तलाठ्यांना महसुली कामासोबतच महसूल वसुली, करमणूक कर, गौण खनिज वसुली, पीक पैसेवारी, फेरफार नोंंदणी, गाव नमुने अद्ययावतीकरण, सीमा आणि भूमापन चिन्हेसंबंधी कामे, निवडणूक संबंधीची कामे, पुरवठा कामे, निवडणूक, जनगणना आदी अनेक कामे करावी लागतात. लोकसंख्या वाढ व कामकाजात वाढ या तुलनेने तलाठ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे त्यांच्या संख्येत वाढ होण्याच्या दृष्टीने तलाठी साझा संख्येत वाढ होणे आवश्यक होते. या अनुषंगाने अभ्यास समिती स्थापन केली होती. समितीने आपला अहवाल शासनास सादर केला आहे. त्यात महानगरपालिका क्षेत्रात पूर्वी २३९ इतकी साझ्यांची संख्या होती ती आता ३६६ वर जाईल म्हणजे १२७ ने वाढ होईल. महानगरपालिका क्षेत्राच्या १० कि.मी पर्यंतचे क्षेत्र (झालर) पूर्वी २१९ आता ३०७ , ८८ वाढणार, अ व ब नगरपालिका पूर्वी १४४ आता २०१, ५७ वाढणार, अ व ब नगरपालिका क्षेत्राच्या ५ किमी पर्यंतचे क्षेत्र पूर्वी २७४ आता ३२८, ५४ वाढणार, क वर्ग नगरपालिका, गिरीस्थान नगरपालिका व नगरपंचायती पूर्वी २०९ होत्या, आता २७२ , ६३ वाढणार, ग्रामीण भाग पूर्वी ९८५३ होते, आता १२२०७ , २३५४ वाढणार, आदिवासी भाग, माडा, मिनी माडा, टीएसपी पूर्वी ११४८ होते, आता १४८३ होणार, ३३५ वाढणार आणि तटीय क्षेत्र पूर्वी २४१ होते ते आता २४७ म्हणजे ६ वाढणार, एकूण राज्यात पूर्वी १२३२७ इतके तलाठी साझा होते.ते आता १५,४११ इतके होणार आहेत. मंत्रिमंडळाची अंतिम मंजुरी मिळाल्यावर तलाठ्यांची पदभरती ही टप्प्याटप्प्याने केली जाईल, असेही अनुप कुमार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)