शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अतुलनीय किल्लेकार

By admin | Updated: November 11, 2015 02:23 IST

महाराष्ट्राला किल्ल्यांचे ऐतिहासिक वैभव लाभले आहे. दोन-चार शिवकालीन किल्ले सोडल्यास, इतर किल्ले काळाच्या ओघात नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

नागपूर : महाराष्ट्राला किल्ल्यांचे ऐतिहासिक वैभव लाभले आहे. दोन-चार शिवकालीन किल्ले सोडल्यास, इतर किल्ले काळाच्या ओघात नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. किल्ला हा निव्वळ इतिहास नाही, तर वास्तुकलेचा अद्भूत नमुना आहे. किल्ल्यांचे जतन, संवर्धन झाले पाहिजे या भावनेतून मध्य रेल्वेत लोकोपायलट असलेले अतुल गुरू एक अभियान राबवित आहे. त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रातील सर्व किल्ले नागपुरात साकारले आहे. किल्लेकार म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.दिवाळीला बहुतांश लहान मुले किल्ले साकारताना दिसतात. अतुल यांनाही बालपणापासूनच किल्ले साकारण्याची आवड होती. नागपूर त्रिशताब्दीपर्यंत अतुल काल्पनिक किल्ले साकारायचे. मात्र त्यानंतर विदर्भातील किल्ले साकारण्यास त्यांनी सुरुवात केली. हुबेहूब किल्ला साकारण्याची त्यांची किमया बघून काहींनी त्यांना शिवकिल्ले साकारण्याचा सल्ला दिला. २००८ पासून ते शिवकिल्ले नागपुरात साकारत आहेत. किल्ला निर्मिती करताना वास्तूपेक्षा वस्तूंना जास्त महत्त्व देतात. कुठलाही किल्ला साकारण्यापूर्वी किल्ल्याचे बारकावे जाणून घेण्यासाठी स्वत: किल्ल्यांना भेटी देतात. किल्ल्यावर लिहिलेले पुस्तक चाळतात. त्याचा अभ्यास करून, किल्ल्याची निर्मिती करतात. किल्ल्यावरील प्रत्येक गोष्ट त्यांनी साकारलेल्या किल्ल्यांमध्ये दर्शवितात. नागपुरातील वेगवेगळ्या भागात अतुल यांनी रायगड, तोरणा, प्रतापगड, पन्हाळगड, सिंधुदुर्ग, सज्जनगड आदी किल्ले साकारले आहेत. अतुल हे सिव्हिल इंजिनिअर आहेत. किल्ला निर्मितीचा त्यांनी छंद जोपासला आहे. त्यांनी आपल्या घरीच वर्कशॉप काढले आहे. या वर्कशॉपमध्ये तटबंदी, बुरुज, गोमुखी, राणीवसा, दारुकोठार, घोडपाग, हत्तीपाग, शरभशिल्प, खिंड, तोफ, पडकोट, वृंदावण, चरीया, जंग्या, विरंगळ किल्ल्यांशी निगडित असलेल्या वस्तू साकारल्या आहे. जवळपास १६ किल्ल्यांच्या वास्तू त्यांच्या घरी आहे. लहानग्यांमध्ये सुद्धा कुतुलह निर्माण व्हावे म्हणून शाळा-शाळांमध्ये किल्ले निर्मितीचे वर्कशॉप घेतात. शेकडो मुले त्यांच्या वर्कशॉपमध्ये सहभागी होतात. मुलांना टाकावू वस्तूंपासून किल्ल्याच्या वास्तू साकारायला शिकवितात. किल्ल्यांप्रति समर्पणामुळे त्यांची ख्याती विदर्भभर पसरली आहे. किल्ल्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी दुर्ग प्रतिष्ठानची स्थापना केले आहे. त्यांच्या मदतीला अ‍ॅड. रवींद्र खापरे, दत्तात्रय सोनेगावकर, शीतल ताम्हण, धनंजय डेग्वेकर, सोहम अपराजित, विशाल देवकर, तुषार घोडमारे, स्वरुपा अपराजित, परिमल पाटणकर, डॉ. शिल्पा भिवापुरकर ही मंडळीसुद्धा सक्रिय सहभागी झाली आहे.(प्रतिनिधी)