शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
3
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
4
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
5
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
6
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
7
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
8
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
9
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
10
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
11
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
12
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
14
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
15
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
16
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
17
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
18
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
19
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
20
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात सडक्या सुपारीच्या काळ्या बाजारावर आयकर विभागाचा सर्जिकल स्ट्राईक

By मोरेश्वर मानापुरे | Updated: January 17, 2026 19:51 IST

राजू अण्णा, कलीवाला बंधूंसह बड्या व्यापाऱ्यांवर छापे : १०० हून अधिक अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह धाडसत्र सुरूच

नागपूर : नागपुरात महानगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच, शनिवारी पहाटे आयकर विभागाने नागपुरातील बड्या सुपारी व्यापाऱ्यांच्या साम्राज्याला मोठा दणका दिला. सडक्या सुपारीच्या अवैध व्यवसायासाठी कुप्रसिद्ध असलेल्या इतवारी आणि मस्कासाथ भागातील व्यापाऱ्यांवर आणि त्यांच्याशी संबंधित ट्रान्सपोर्टर्सवर आयकर विभागाने एकाच वेळी छापे टाकल्याने संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. कर चुकवेगिरी करून कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविणाऱ्या या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांनी कोट्यवधीं रुपयांच्या व्यवहाराची कागदपत्रे आणि रोख रक्कम जप्त केल्याची माहिती आहे.

करचुकवेगिरी करणारे अनेक व्यापारी रडारवर

आयकर विभागाच्या मुंबई आणि नागपूर पथकातील १०० हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पहाटे शांतीनगर येथील राजूू अण्णा (राजेश शिनॉय) आणि कामठी रोडवरील निवासस्थान, अल्ताफ, आसिफ आणि गनी कलीवाला यांची कार्यालये आणि गोदामांची झाडाझडती सुरू केली. तसेच सुपारी वाहतुकीशी संबंधित काही ट्रान्सपोर्ट व्यावसायिकही विभागाच्या कचाट्यात आले आहेत.

मुंबई कनेक्शन आणि कारवाई

मुंबईतील कुप्रसिद्ध सुपारी व्यापारी फारूखभाई यांच्याशी असलेल्या आर्थिक संबंधांच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे. शनिवारी पहाटे कडेकोट बंदोबस्तात हे पथक नागपुरात दाखल झाले. पथकाने कळमना, भंडारा रोडवरील मां उमिया इंडस्ट्रियल एरियातील गोदामे, तसेच इतवारी, मस्कासाथ, जागनाथ बुधवारी येथील व्यापाऱ्यांची दुकाने आणि गोदामांची कसून तपासणी केली.

पथकाच्या सुरक्षेसाठी ह्यएके-४७ह्ण ने सुरक्षा रक्षक सज्ज

कारवाईचे गांभीर्य लक्षात घेता, एके-४७ ने सज्ज असलेले सुरक्षा रक्षक आणि डॉग स्कॉडचा ताफा सोबत असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पाहायला मिळाले.

मोठी बेहिशेबी मालमत्ता उघड होण्याची शक्यता

शनिवारी रात्रीपर्यंत कारवाई सुरू होतील. ही कारवाई आणखी दोन दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. जप्त केलेल्या कागदपत्रांची आणि रोख रकमेची मोजणी सुरू आहे. सडक्या सुपारीच्या व्यवहारातून कमावलेला काळा पैसा आणि टॅक्स चोरी या मुद्दांवर आयकर विभागाचे विशेष लक्ष आहे. सध्यातरी आयकर विभागाचे अधिकारी अधिकृत माहिती देण्यास तयार नाही, तरी या धाडसत्रातून मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Income Tax raids rotten betel nut black market in Nagpur.

Web Summary : Income Tax Department raided Nagpur betel nut traders, uncovering tax evasion. Officials seized documents and cash, suspecting links to Mumbai traders. Raids continue, revealing potential illegal wealth.
टॅग्स :nagpurनागपूरIncome Taxइन्कम टॅक्स