शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

तीन दिवसीय लोकमत एज्युकेशन फेअरचे उद्घाटन : विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक पर्यायांचा खजिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 11:56 PM

लोकमततर्फे एक अभिनव आणि प्रशंसनीय उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रदर्शनात विविध नामांकित विद्यापीठ, तसेच अनेक राज्यांसह देशातील महाविद्यालयांच्या विभिन्न कोर्सेसची माहिती विद्यार्थी आणि पालकांसाठी एकाच छताखाली उपलब्ध आहे. याचा विद्यार्थी आणि पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी येथे केले.

ठळक मुद्देनामांकित संस्था आणि विद्यापीठांचे स्टॉल, उच्च शिक्षणाची माहिती उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकमततर्फे एक अभिनव आणि प्रशंसनीय उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रदर्शनात विविध नामांकित विद्यापीठ, तसेच अनेक राज्यांसह देशातील महाविद्यालयांच्या विभिन्न कोर्सेसची माहिती विद्यार्थी आणि पालकांसाठी एकाच छताखाली उपलब्ध आहे. याचा विद्यार्थी आणि पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी येथे केले.रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये मंगळवारपासून आयोजित तीन दिवसीय लोकमत एज्युकेशन फेअर-२०१९ च्या उद्घाटनप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. व्यासपीठावर दी युनिक अकॅडमीचे सुनील कुदळे, एमिटी विद्यापीठाचे डॉ. सुरेंद्र रहमतकर, एसबीआयचे सहायक महाव्यवस्थापक फनिश गुप्ता, एसबीआय व्हीएनआयटी शाखेचे मुख्य व्यवस्थापक रामभाऊ तक्तेवाले, एसबीआय मानेवाडा शाखेचे व्यवस्थापक बलवंत कुमार, उपव्यवस्थापक अनिल खाडिलकर, लोकमतचे संपादक दिलीप तिखिले उपस्थित होते.जिचकार म्हणाल्या, जीवनात यशासाठी उच्च शिक्षण महत्त्वाचे आहे. याकरिता उत्तम संस्थेतून शिक्षण घेणे आवश्यक आहे. दहावी आणि बारावीनंतर संस्था आणि कोर्सेच्या माहितीअभावी विद्यार्थ्यांना जीवनात अपेक्षित यश मिळत नाही. या धर्तीवर हे प्रदर्शन सर्वोत्तम असून विविध शैक्षणिक पर्यायांचा खजिना सादर करण्यात आला आहे. याचा विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.प्रदर्शन गुरुवार, १३ जूनपर्यंत सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंत सुरू राहील. प्रदर्शन महाराष्ट्रात सर्वात मोठे आहे. येथे ३० पेक्षा जास्त शैक्षणिक संस्थांचे स्टॉल असून विद्यार्थ्यांना मेडिकल, इंजिनिअरिंगसह फॅशन, ग्राफिक्स, अ‍ॅनिमेशन, स्पर्धा परीक्षा आणि डिझायनिंग, कलात्मकता, आयटी, गेमिंग आणि आर्टसारख्या विभिन्न क्षेत्रातील कोर्सेसची माहिती देण्यात येत आहे. प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक दी युनिक अकॅडमी आहे तर सहप्रायोजक एमिटी युनिव्हर्सिटी आणि बॅकिंग पार्टनर एसबीआय आहे. रेडियो पार्टनर रेड एफएम आणि अ‍ॅडवॅम्स डिजिटल पार्टनर आहेत.विद्यार्थ्यांचा सत्कार, विजेत्यांना पुरस्कारप्रदर्शनात इयत्ता १० आणि १२ वी परीक्षेत उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येत आहे. सोबत मार्कशीट आणणे आवश्यक आहे. दररोज होणाऱ्या चर्चासत्रात आकर्षक भेटवस्तू आणि भाग्यशाली सोडतीतील विजेत्याला ब्लूटूथ स्पीकर भेटस्वरुपात देण्यात येत आहे. मंगळवारी काढलेल्या सोडतीत मनीषनगर निवासी मीरा मिसाळ आणि नाशिकचे भास्कर रोहित वसंतराव विजेते ठरले आहेत.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटEducationशिक्षणStudentविद्यार्थी