मेडिकलमध्ये आता वृद्धांसाठी स्वतंत्र ओपीडी, सर्जरी, मेडिसीन, गायनिक, आॅथोर्पेडिक तज्ज्ञ देणार सेवा

By सुमेध वाघमार | Published: March 5, 2024 07:16 PM2024-03-05T19:16:20+5:302024-03-05T19:17:00+5:30

Nagpur: वृद्धांचे आजार, त्यांच्या समस्या, गरजा वेगळ्या असतात. याची दखल घेऊन शासनाने शासकीय रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र ‘जेरियाट्रिक ओपीडी’ सुरू करण्याचा निर्णय घेतला.

In medical, now separate OPD, surgery, medicine, gynecology, orthopedic specialists will provide services for the elderly. | मेडिकलमध्ये आता वृद्धांसाठी स्वतंत्र ओपीडी, सर्जरी, मेडिसीन, गायनिक, आॅथोर्पेडिक तज्ज्ञ देणार सेवा

मेडिकलमध्ये आता वृद्धांसाठी स्वतंत्र ओपीडी, सर्जरी, मेडिसीन, गायनिक, आॅथोर्पेडिक तज्ज्ञ देणार सेवा

- सुमेध वाघमारे 
नागपूर -  वृद्धांचे आजार, त्यांच्या समस्या, गरजा वेगळ्या असतात. याची दखल घेऊन शासनाने शासकीय रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र ‘जेरियाट्रिक ओपीडी’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्वभूमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) मंगळवारी अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्या हस्ते या ‘ओपीडी’चा शुभारंभ करण्यात आला.

 वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिपत्याखाली येणारे सर्व शासकीय रुग्णालय व दंत रुग्णालयात वर्षातून दोनदा ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय मागील महिन्यात शासनस्तरावर घेण्यात आला. त्यांच्या आरोग्याची नोंद आभा कार्ड किंवा एचएमआयएस प्रणालीमध्ये घेण्याचेही निर्देश देण्यात आले होते. याची दखल घेत मेडिकल प्रशासनाने ‘जेरियाट्रिक ओपीडी’ सुरु केली. उद्घाटनप्रसंगी उपअधिष्ठाता डॉ. देवेन्द्र माहोरे व डॉ. उदय नारलावार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, डॉ. ब्रिजेश गुप्ता, डॉ. मिलिंद व्यवहारे, डॉ. सुमेध चौधरी, डॉ. अशोक दिवाण, डॉ. वासुदेव बारसागडे उपस्थित होते. 

-‘ओपीडी’मध्ये या मिळातील सेवा 
जेरियाट्रिक बाह्यरुग्ण विभागात सर्जरी, मेडिसीन, गायनिक, आॅथोर्पेडिक व इतर विभागाचे डॉक्टर्स सेवा देतील. तसेच ज्येष्ठ नागरीकांसाठी वेगळे नोंदणी कक्ष असणार आहे. येथे सर्व वैद्यकीय सुविधा मोफत राहतील, अशी माहिती डॉ. गजभिये यांनी दिली.

Web Title: In medical, now separate OPD, surgery, medicine, gynecology, orthopedic specialists will provide services for the elderly.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.