मोठा अनर्थ टळला! डुलकी लागली अन् कार पुलावरून थेट रेल्वेच्या ट्रॅकवर; ५ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 11:11 IST2023-07-02T11:10:52+5:302023-07-02T11:11:12+5:30

बुलढाण्यातील अपघाताची घटना ताजी असताना आणखी एक भीषण अपघात झाला.

in maharashtra a speeding car fell on the railway track from the Borkhedi flyover in Nagpur  | मोठा अनर्थ टळला! डुलकी लागली अन् कार पुलावरून थेट रेल्वेच्या ट्रॅकवर; ५ जण जखमी

मोठा अनर्थ टळला! डुलकी लागली अन् कार पुलावरून थेट रेल्वेच्या ट्रॅकवर; ५ जण जखमी

नागपूर: बुलढाण्यातील अपघाताची घटना ताजी असताना आणखी एक भीषण अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचे कळते. नागपुरातीस बोरखेडी शिवारात कार थेट पुलावरून खाली कोसळल्याने ५ जण जखमी झाले. सर्व प्रवाशी एकाच कुटुंबातील असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

दरम्यान, प्रवाशी आपल्या कुटुंबासह हैदराबाद येथून नागपूरच्या दिशेने जात होते. चालकाला डुलकी लागल्याने कार अचानक पुलावरून खाली कोसळली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हा अपघात एवढा भीषण होता की, गाडीचा चाकाचुरा झाला. आज सकाळी साडेसातच्या सुमारास नागपूरच्या बोरखेडी उड्डाणपुलावरून भरधाव वेगात असलेली कार रेल्वे रुळावर पडली. या अपघातात कारमधून प्रवास करणारे ५ जण जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती स्थानिक बुटीबोरी पोलिसांनी दिली आहे.

 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

भाजपा (29005 votes)
शिवसेना (3598 votes)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (28422 votes)
काँग्रेस (7048 votes)
राष्ट्रवादी काँग्रेस (9798 votes)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (11906 votes)
वंचित बहुजन आघाडी (11579 votes)
आम आदमी पार्टी (3454 votes)
भारत राष्ट्र समिती (2029 votes)
अन्य (1492 votes)

Total Votes: 108331

VOTEBack to voteView Results

Web Title: in maharashtra a speeding car fell on the railway track from the Borkhedi flyover in Nagpur