शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त शिवार’ची कालबद्ध अंमलबजावणी करा

By admin | Updated: August 19, 2016 02:48 IST

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामांची निवड करतांना शेतीसाठी प्रत्यक्ष संरक्षित सिंचनाचा लाभ होईल

विभागातील कामांचा आढावा : जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्या सूचना नागपूर : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामांची निवड करतांना शेतीसाठी प्रत्यक्ष संरक्षित सिंचनाचा लाभ होईल अशाच कामांना प्राधान्य देऊन कालबद्ध कार्यक्रमानुसार कामे पूर्ण करा, अशा सूचना राज्याचे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी गुरुवारी येथे दिल्यात. नागपूर विभागातील जलयुक्त शिवार अभियान कामांचा आढावा जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी घेतला त्यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. डॉ.आबासाहेब खेडकर सभागृहात आयोजित या बैठकीस पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जि.प. अध्यक्षा निशा सावरकर, आमदार सुनील केदार, आ. डॉ.आशिष देशमुख, आ. समीर मेघे, आ. प्रा. अनिल सोले, आ. सुधाकर देशमुख, आ. राजेश ऊर्फ बाळा काशीवार, आ. समीर कुणावार, आ. चरण वाघमारे प्रमुख पाहुणे होते. विभागीय आयुक्त अनुप कुमार, जलसंधारण सचिव पुरुषोत्तम भापकर, कृषी आयुक्त विकास देशमुख, संचालक एस. एस. जाधव, मुख्य अभियंता शिवकुमार गिरी, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचे आयुक्त अभय महाजन, अपर आयुक्त हेमंत बसेकर, उपसचिव किशोर पठारे, नारायण सराफ आदी अधिकारी उपस्थित होते. विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी महिती देतांना सांगितले की, नागपूर विभागात १ हजार ९८१ गावांची निवड करण्यात आली होती. मागील वर्षाचे अपूर्ण व यावर्षी सुचविण्यात आलेल्या एकूण २८ हजार ७४० कामांसाठी ७५० कोटी रुपयाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यावर्षी ३२१६ कामे हाती घेण्यात आली होती. त्यापैकी ३२०७ कामे पूर्ण झाली आहेत. ‘मागेल त्याला शेततळे’ या कार्यक्रम अंतर्गत ८४७४ च्या उद्दिष्टापैकी ८८८२ आॅनलाईन अर्ज केले. त्यापैकी ७५९४ कामे सुरु झाल्याचे सांगितले. नागपूर विभागाचे जिल्हानिहाय आढावा जिल्हाधिकारी यांनी सादर केला. यावेळी लोकप्रतिनिधींना जलयुक्त शिवार अभियानांतर्गत लोकसहभाग वाढविण्यासाठी तसेच नियोजित वेळात कामे पूर्ण करण्यासाठी गावनिहाय कामांची माहिती उपलब्ध करुन द्यावी, अशी सूचना केली. भंडारा जिल्ह्याची जलयुक्त शिवार या पुस्तिकेचे विमोचन जलसंधारण मंत्री यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी प्रास्ताविक केले. संचालन दिनेश मासुळकर, उपमुख्य कार्यपालन अधिकारी कमलकिशोर फुटाणे व विजयी बोंद्रे यांनी केले. उपायुक्त पराग सोमण यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)