शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

सत्तेवर आलो तर सरसंघचालकांना तुरुंगात टाकू : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:39 AM

शासनदरबारी कुठलीही नोंदणी नसलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात कुणी उभे राहिले तर त्याच्या नावाने कंड्या पिकविण्याचे काम केले जाते. पंतप्रधानांच्या हत्येच्या कटात माझे नाव जाणुनबुजून अडकविण्यात आले. मात्र याचे उत्तर त्यांना व भाजपाला निवडणुकीत मिळेल. राज्यात त्यांना दोन आकडी जागांवर आम्ही आणू. विशेषत: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांना तर बेकायदेशीरपणे एके-५६ बाळगल्याच्या प्रकरणात आम्ही नागपूरच्याच तुरुंगात टाकू, असे खळबळजनक वक्तव्य भाीरप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले. नागपुरात वंचित बहुजन आघाडीतर्फे अर्थव्यवस्था अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे जाहीर सभेदरम्यान ते बोलत होते.

ठळक मुद्देओवेसींविनाच झाली वंचित बहुजन आघाडीची सभा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासनदरबारी कुठलीही नोंदणी नसलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात कुणी उभे राहिले तर त्याच्या नावाने कंड्या पिकविण्याचे काम केले जाते. पंतप्रधानांच्या हत्येच्या कटात माझे नाव जाणुनबुजून अडकविण्यात आले. मात्र याचे उत्तर त्यांना व भाजपाला निवडणुकीत मिळेल. राज्यात त्यांना दोन आकडी जागांवर आम्ही आणू. विशेषत: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांना तर बेकायदेशीरपणे एके-५६ बाळगल्याच्या प्रकरणात आम्ही नागपूरच्याच तुरुंगात टाकू, असे खळबळजनक वक्तव्य भाीरप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले. नागपुरात वंचित बहुजन आघाडीतर्फे अर्थव्यवस्था अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे जाहीर सभेदरम्यान ते बोलत होते. 

या सभेला ‘एआयएमआयएम’चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी हेदेखील येणार होते. संघभूमीत येऊन ओवेसी काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचेदेखील लक्ष लागले होते. मात्र ओवेसी हे अखेरपर्यंत आलेच नाही.त्यांच्या अनुपस्थितीत आ.वारीस पठाण व आ.इम्तियाज जलील हे उपस्थित होते. एखाद्या व्यक्तीकडे चाकू सापडला की त्याच्याविरोधात त्वरित गुन्हा दाखल करण्यात येतो. विजयादशमीच्या दिवशी सरसंघचालक तर खुलेआमपणे एके-५६ ची पूजा करतात. मग त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात विलंब का होत आहे असा प्रश्न आंबेडकर यांनी उपस्थित केला. जर सरकारने गुन्हा दाखल केला नाही तर सरकारदेखील सहआरोपी होईल, असे ते म्हणाले. काँग्रेस व भाजप दोन्ही पक्षांना नक्षलग्रस्त भागातील खनिजसंपत्ती लुटायची आहे. म्हणून सलवाजुडुम राबविण्यात आला, असा आरोपदेखील त्यांनी केला.‘आरबीआय’ इतिहासजमा करायची आहे का ?ऊर्जित पटेल यांच्या जागी ‘आरबीआय गव्हर्नर’ म्हणून शक्तिकांत दास यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र दास हे प्रत्यक्षात इतिहासाचे पदवीधर आहेत. मग त्यांना आरबीआयचे गव्हर्नर का केले ही कोड्यात टाकणारी बाब आहे. संघ आरबीआयला इतिहासजमा करायला निघाला आहे का, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.अशोक चव्हाणांकडे अधिकारच नाहीतयावेळी आंबेडकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनादेखील चिमटा काढला. काँग्रेसला आमच्याशी आघाडी करायची आहे, पण त्यांना ‘एआयएमआयएम’ चालत नाही. याच ‘एआयएमआयएम’च्या खासदाराचे मत त्यांनी अणुकराराच्या वेळी अडचणीत का घेतले होते? चव्हाणांनी चारवेळा बोलाविले. मात्र त्यांच्याकडे आघाडी करण्याचे केंद्रीय नेतृत्वाने अधिकार दिले आहेत का, याचे उत्तर त्यांनी अद्याप दिलेले नाही. काँग्रेसला आम्ही हवे असू तर ‘एआयएमआयएम’लादेखील सोबत घ्यावेच लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.सभेला तीन तास विलंबकार्यक्रमपत्रिकेत सभेची वेळ दुपारी २ ची देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात ५ नंतर सभेला सुरुवात झाली. त्यातही मंचावर सुमारे २० जणांची भाषणे झाली. त्यानंतर आंबेडकर यांच्या भाषणाला सुरुवात झाली. नेत्यांच्या भाषणातून काँग्रेससोबत आघाडी नको, असा सूर दिसून आला. शिवाय आंबेडकर यांनी नागपुरातून लोकसभेची निवडणूक लढवावी, अशी मागणी महासचिव गुणवंत देवपारे यांनी केली. यावेळी सागर डबरासे, राजू लोखंडे, रवी शेंडे, किरण पाटणकर, निशा शेंडे, वनमाला उके, कमलेश भगतकर, कुशल मेश्राम, जीवन गायकवाड, रमेश पाटील, नजमुन्नीसा बेगम, श्रद्धा चव्हाण, विजय मोटे इत्यादी उपस्थित होते.

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरKasturchand Parkकस्तूरचंद पार्क