शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
2
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
3
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
4
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
5
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
6
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
7
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
8
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
9
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
10
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
11
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
12
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
13
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
14
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
15
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
16
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
17
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
18
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
19
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
20
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणावरील स्थगनादेश दूर न झाल्यास पावले उचलणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मराठा आरक्षणाच्या प्रकरणी देशात विचित्र स्थिती सुरू आहे. इडब्लूएस आरक्षण २६ राज्ये आणि दोन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मराठा आरक्षणाच्या प्रकरणी देशात विचित्र स्थिती सुरू आहे. इडब्लूएस आरक्षण २६ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशात लागू आहे. मात्र, ते ५० टक्क्यांपुढचे आहे. तेलंगणा, तामिळनाडूतही ५० टक्क्यांवर सुरू आहे. महाराष्ट्रात फक्त २ टक्के मराठा आरक्षण सुरू असताना चुुकीच्या पाश्वभूमीवर स्थगिती मिळाल्याचा आमचा आरोप आहे. मराठा आरक्षणावरील स्थगिती दूर न झाल्यास ५० टक्क्यांच्या आत आरक्षण मिळण्यासाठी पावले उचलावी लागतील, असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंडरे यांनी दिला आहे.

महासंघाच्या बैठकीसाठी नागपुरात आले असता ते ‘लोकमत’शी बोलत होते. ते म्हणाले, राज्याने स्थगिती उठविणे अभिप्रेत आहे. ती अधिक लांबल्यास मराठा आरक्षण पुढचे १५ ते २० वर्षे लटकू शकते. २०१८ मध्ये न्या. गायकवाड कमिशनचा अहवाल राज्य सरकारला मिळाला, अधिसूचना झाली. याची मुदत २०२८पर्यंत असल्याने सर्वोच्च न्यायालयात लवकर निर्णय झाला नाही तर मराठा समाजाला अन्याकारक ठरेल. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने थोडे ऐतिहासिक पाऊल उचलावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

केंद्र सरकार सध्याच्या २७ टक्के आरक्षणाचे त्रिभाजन करणार आहे. त्यात अती मागास, मागास आणि आणि व्यावसायिक दृष्ट्या मागास असे विभाजन करेल. राज्यात एकूण ओबीसी लोकसंख्या ३२ टक्के आहे. व्हजेएनटी ११ टक्के, एसबीसीला २ टक्के आणि उरलेल्या १९ टक्क्यात ओबीसीला आरक्षण आहे. या १९ टक्क्यात १२ बलुतेदारांना स्थान नाही. त्यांना लाभ देण्यासाठी धनगर, वंजारीची वेगळी कॅटागिरी केली, त्या धर्तीवर १२ बलुतेदारांची वेगळी वर्गवारी तयार करावी,

त्या धर्तीवर ५० टक्क्यांच्या आत मराठा समाजाला पुरेसे प्रतिनिधीत्व देण्यासाठी सब कॅटॅगिरी करून वेगळे आरक्षण देण्यात यावे, असे मत त्यांनी मांडले.

स्थगिती न उठल्यास व तामिळनाडू केसला टॅग झाल्यास मराठा आरक्षणासाठी आऊट ऑफ कोर्ट महाराष्ट्र राज्य विधिमंडळ ठराव करून नियमित तरतुुदीनुसार मराठा समाजाला ५० टक्के आरक्षण देऊ शकते. लोकसंख्येनुसार मराठा समाजाची लोकसंख्या ३० टक्केपेक्षा जास्त असल्याने धोरणात्मक निर्णय म्हणून या समाजातील वंचित घटकांना न्याय देण्यासाठी ५० टक्क्यात स्पेस तयार करावी, असे मराठा समाजाचे सरकारला आवाहन आहे.

...

वडेट्टीवारांचे विधान धक्कादायक

मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अखत्यारीत न्या. गायकवाड कमिशन येतो. मात्र, हे कमिशनच बोगस असल्याचे धक्कादायक विधान नागपुरात केले. मराठा आरक्षणाचा मूळ पायाचा न्या. गायकवाड कमिशन आहे. हा अहवाल चांगला आहे, हे सांगण्यासाठी राज्य सरकारची उपसमिती एकीकडे प्रयत्न करीत असताना याच खात्याचे मंत्री विरोधाभासी विधान करतात. यामुळे मराठा आरक्षण एका बाजूने जगवायचे, दुसऱ्या बाजूने घालवायचे असेच दिसते.

...