शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

होम क्वारंटाईन बाहेर निघाले तर गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 21:18 IST

होम क्वारंटाईनमध्ये असलेले लोक बिनधास्तपणे घराबाहेर फिरत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार संबंधिताच्या कुटुंबासाठीच नव्हे तर नागरिकांसाठीही धोकादायक आहे. तेव्हा अशा लोकांविरुद्ध कडक कारवाईची गरज आहे. होम क्वारंटाईन असलेली मंडळी घराबाहेर निघाली तर गुन्हे दाखल करा, अशी मागणी पुढे आली आहे.

ठळक मुद्देबिनधास्त फिरताहेत घराबाहेर : चोवीस तासानंतर नागपूर प्रशासनाने घेतली दखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून विदेशातून प्रवास करून आलेल्यांना ‘होम क्वारंटाईन’( घरीच एकटे ) राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशा लोकांना कुठल्याही परिस्थितीत घरातील एका खोलीत स्वत:ला एकटे करून घ्यायचे आहे. कुटुंबातील इतर सदस्यांच्या संपर्कात यायचे नाही. अशा लोकांवर प्रशासन व पोलीस विभागाचे लक्ष असल्याचा दावा केला जात आहे, परंतु वस्तुस्थिती वेगळीच आहे. होम क्वारंटाईनमध्ये असलेले लोक बिनधास्तपणे घराबाहेर फिरत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार संबंधिताच्या कुटुंबासाठीच नव्हे तर नागरिकांसाठीही धोकादायक आहे. तेव्हा अशा लोकांविरुद्ध कडक कारवाईची गरज आहे. होम क्वारंटाईन असलेली मंडळी घराबाहेर निघाली तर गुन्हे दाखल करा, अशी मागणी पुढे आली आहे.खामला परिसरातील एका सोसायटीमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. अमेरिकेवरून एक व्यक्ती प्रवास करून आला आहे. त्याला प्रशासनाने होम क्वारंटाईन केले आहे. परंतु तो बुधवारी बिनधास्तपणे घराबाहेर फिरत असल्याचे परिसरातील लोकांना दिसून आले. लोकांनी यासंदर्भात मनपा, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलिसांशी संपर्क साधला. परंतु कुणीही दखल घेतली नाही. वारंवार फोन करूनही नियंत्रण कक्षातून त्यांना टाळाटाळीचे उत्तर दिले जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. अखेर आज शुक्रवारी पोलीस सतर्क झाले. ते होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तीच्या घरी पोहोचले. संबंधिताला घरीच राहण्याची सक्त ताकीद दिली. तसेच यानंतर हा व्यक्ती घराबाहेर दिसला तर त्याचे फोटो काढून पाठवा, अशा सूचनाही केल्या.विशेष म्हणजे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासन व प्रशासन स्तरावर अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. आतापर्यंत ९०१ लोकांना होम क्वारंटाईनमध्ये राहण्यास सांगण्यात आले आहे. लॉकडाऊन व कर्फ्यू लावण्यात आला आहे. नागरिकांना घरीच राहण्यास सांगितले आहे. पोलीस कठोर कारवाईसुद्धा करीत आहेत. अशा परिस्थितीत होम क्वारंटाईन व्यक्ती अशाप्रकारे बिनधास्त फिरतो आणि तक्रार केल्यानंतरही कारवाई होण्यास २४ तास लागत असतील तर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होतात. ज्या खामला परिसरातील ही घटना आहे त्याच परिसरात कोरोना पॉझिटिव्ह असलेले लोकही आढळून आले आहेत. तेव्हा ही बाब आणखीनच गंभीर ठरते.... तर अशांची नावेच प्रसिद्ध कराकोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, म्हणून शासन प्रशासन विविध उपाययोजना करीत आहेत. सध्या शहरात ९०१ लोकांना होम क्वॉरंटाईन आहेत. प्रशासनाने आतापर्यंत परिस्थिती चांगली नियंत्रणात ठेवली आहे. परंतु होम क्वॉरंटाईन असलेली मंडळी दिशा-निर्देशांचे पालन करीत नसतील. बिनधास्तपणे घराबाहेर फिरत असतील तर ते त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे तर सर्वांसाठीच धोकायदाय आहे. आतापर्यंत प्रशासनाने माणुसकी म्हणून अशा लोकांची ओळख पटू नये, याची काळजी घेतली. त्यांची नावे जाहीर केली नाही. परंतु हा प्रकार थांबला नाही, तर नागरिकांच्या हितासाठी प्रशासनाने अशा होम क्वॉरंटाईन लोकांच्या नावाची यादीच प्रसिद्ध करावी, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर