ह्युंडई अल्काझर प्रिमियम एसयूव्ही विक्रीसाठी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:07 IST2021-06-19T04:07:12+5:302021-06-19T04:07:12+5:30

नागपूर : ह्युंडई मोटर इंडिया लिमिटेडने सहा आणि सात सीटर प्रिमियम एसयूव्ही ह्युंडई अल्काझारसाठी बुकिंग सुरू करण्याची घोषणा केली ...

Hyundai Alcazar Premium SUV filed for sale | ह्युंडई अल्काझर प्रिमियम एसयूव्ही विक्रीसाठी दाखल

ह्युंडई अल्काझर प्रिमियम एसयूव्ही विक्रीसाठी दाखल

नागपूर : ह्युंडई मोटर इंडिया लिमिटेडने सहा आणि सात सीटर प्रिमियम एसयूव्ही ह्युंडई अल्काझारसाठी बुकिंग सुरू करण्याची घोषणा केली असून कंपनी हुंडई डीलरशिपवर बुकिंग स्वीकारत आहे. ग्राहकांना बुकिंगसाठी ऑनलाईन कार खरेदीच्या प्लॅटफॉर्मवर क्लिक करता येईल. बुकिंग ९ जूनपासून सुरू आहे.

प्रीमियम एसयूव्ही शुक्रवारी कंपनीचे डीलर केतन ह्युंडई, इरोज ह्युंडई आणि बिगविग ह्युंडईमध्ये विक्रीसाठी दाखल करण्यात आली.

बुकिंगच्या घोषणेवर कंपनीचे संचालक (विक्री, विपणन आणि सेवा) तरुण गर्ग म्हणाले, ह्युंडईने भारतात २५ वर्षांचा उत्कृष्ट प्रवास केला आहे. वर्षानुवर्षे ग्राहकांच्या अनुभवांना उन्नत करणाऱ्या बेंचमार्क उत्पादनांसह ग्राहकांची स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांचे एसयूव्हीप्रति आकर्षण वाढले आहे. क्रेटा, व्हेन्यूू, टक्सन आणि कोना इलेक्ट्रिक सारख्या एसयूव्ही २०२० मध्ये भारतात सर्वाधिक विक्रीच्या बनल्या आहेत. ह्युंडई अल्काझार या सहा आणि सात सीटच्या एसयूव्हीसाठी बुकिंग सुरू केली आहे. या एसयूव्हीच्या माध्यमातून ग्राहकांना क्वालिटी टाईम, एकत्र प्रवास करणे अधिक संस्मरणीय आणि मजेदार अनुभव येणार आहे. एसयूव्ही अद्ययावत उपकरणे, वैशिष्ट्यांसह ६-स्पीड मॅन्युअल व ऑटोमॅटिक २.० आय पेट्रोल आणि ६-स्पीड मॅन्युअल व ऑटोमॅटिक १.५ आय डिझेलमध्ये उपलब्ध आहे.

कारच्या दाखलीकरणाप्रसंगी केतन ह्युंडईमध्ये एचएमआयएलचे टेरेटरी विक्री व्यवस्थापक रोहित डोडला, केतन ह्युंडईचे वरिष्ठ महाव्यवस्थापक लेस्ली साळवे, इरोज ह्युंडईमध्ये डीलर प्रिन्सिपल अनुज पांडे, एचएमआयएलचे टेरेटरी विक्री व्यवस्थापक तन्मय मिश्रा, इरोज ह्युंडईचे महाव्यवस्थापक सूरज भुसारी आणि बिगविग ह्युंडईमध्ये महापौर दयाशंकर तिवारी, एचएमआयएलचे टेरेटरी विक्री व्यवस्थापक शंतनू राठोड, बिगविग ह्युंडईचे विक्री प्रमुख रवींद्र गायकवाड व सहायक विक्री व्यवस्थापक उमेश काहालकर उपस्थित होते. (वा.प्र.)

Web Title: Hyundai Alcazar Premium SUV filed for sale