शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मधुर गीतांचा ‘जिंदगी कैसी है पहेली’

By admin | Updated: January 2, 2016 08:37 IST

कलावंतांच्या हृदयात गाणे असतेच. मनाची प्रसन्नता गडद झाली की, ते ओठावर येते आणि श्रोत्यांच्या कानामनात

नागपूर : कलावंतांच्या हृदयात गाणे असतेच. मनाची प्रसन्नता गडद झाली की, ते ओठावर येते आणि श्रोत्यांच्या कानामनात स्थिरावते. डेक्कन युथ वेलफेअर आणि राजश्री संस्थेतर्फे नवोदित गायकांच्या ‘मिठी यादे - जिंदगी कैसी है पहेली...’ या सिनेगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी लोकप्रिय गीतांच्या सादरीकरणाने गायकांनी उपस्थितांची दाद घेतली.हा कार्यक्रम विदर्भ हिंदी साहित्य संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे आयोजन राजा ग्वालानी यांनी केले. कार्यक्रमात जफर शेख, पंडित मेश्राम, श्रीकांत दीक्षित, नंदा डोंगरे, राजा ग्वालानी, कांचन रामटेके, दिनेश जाधव, फिरोज खान, स्वाती चहांदे या गायकांचा सहभाग होता. काळाच्या कसोटीवर टिकून राहिलेली सदाबहार हिंदी सिनेगीते या गायकांनी उत्साह, आनंद आणि तयारीने सादर केली. गायक जफरभाई सादरीत ‘सुरज की गर्मी से जलते हुअ‍े तनको मिल जाये तरुवर की छाया..’ या प्रसन्न गीताने कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. यानंतर अनमोल घडी, चोरी चोरी, ज्युली, नागिन, शालिमार, हम किसी से कम नही, दिले नादा, आशिक आदी चित्रपटातील २१ गीते सर्वच गायकांनी ताकदीने सादर करून रसिकांना आनंद दिला. ‘आवाज दे कहाँ है.., भूल गया सबकुछ.., जिंदगी देनेवाले..., क्या हुआ तेरा वादा.., हम बेवफा हरगीज ना थे, दिल को देखो..., जिंदगी कैसी है पहेली हाये..., ऐसे तो ना देखो.., आजा सनम मधुर चांदनी मे हम..’ आदी गीते यावेळी तयारीने सादर करण्यात आली. काही रोमांचक युगल गीते काही एकल गीते होती. कार्यक्रमाचे संचालन फिरोज खान यांचे होते. याप्रसंगी उद्योगपती प्रफुल्लभाई शाह, राजेश खरे, लखन सिंग, सुधीर मेश्राम, जयप्रकाश माथुर, तीश गजभिये, पब्रेम मद्रे आणि मधुरिका गडकरी यांचे स्वागत आयोजकांतर्फे करण्यात आले. कार्यक्रमाला सिनेसंगीताचे दर्दी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)