शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

गरीब महिला कशा होणार आत्मनिर्भर

By admin | Updated: March 16, 2015 02:12 IST

गरिबीवर मात करण्यासाठी स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील हजारो महिला एकत्र आलेल्या आहेत.

लोकमत विशेषगणेश हूड नागपूरगरिबीवर मात करण्यासाठी स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील हजारो महिला एकत्र आलेल्या आहेत. परंतु बँकांनी असहकाराचे धोरण स्वीकारल्याने त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरण्याची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत गरीब महिला आत्मनिर्भर कशा होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.मोलमजुरी करणाऱ्या वा गरज असूनही रोजगार नसलेल्या महिलांना लहानसहान आर्थिक अडचणींवर मात करता यावी, यासाठी समूहाच्या माध्यमातून दर महिन्याला बचत करून निकड असलेल्या महिलांना मदत केली जाते. समूहाचे बँकेत खाते उघडल्यानंतर जमा रकमेच्या ४ ते ८ पट कर्जस्वरूपात आर्थिंक मदत मिळणे अपेक्षित असते. परंतु जिल्ह्यातील ९९८ प्रकरणे बँकांकडे गेल्या वर्षभरापासून प्रलंबित आहेत. समूहांच्या आर्थिक मदतीसंदर्भातील तक्रारींचा निपटारा व्हावा, यासाठी दर महिन्याची ११ व २६ तारीख निश्चित करण्यात आली आहे. परंतु बँकांकडून कोणत्याही स्वरूपाचा प्रतिसाद मिळत नाही. एवढेच नव्हे तर महिलांना तासन्तास बँकेत बसवून ठेवले जाते. त्या महिला मजुरी पाडून आशेने बँकेत येतात. लहान मुलांना सोबत आणावे लागते. परंतु बँकांतील अधिकाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. स्वयंसहाय्यता समूहात प्रामुख्याने दारिद्र्र्य रेषेखालील महिलांचा समावेश आहे. कर्जाची मागणी करण्यापूर्वी त्यांना निकष पूर्ण करावे लागतात. समूहाची स्थापना केल्यानंतर १५ दिवसांत बँके त खाते उघडावे लागते. त्यानंतर ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून व्यवसायासाठी तीन महिन्याचे प्रशिक्षण घ्यावे लागते. प्रशिक्षणासोबतच त्यांना सामाजिक दायित्व म्हणून घेतेल्या कर्जाची परतफेड करण्याचा सल्ला दिला जातो. घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याची त्यांची तयारी असते. परंतु बँकांकडून प्रतिसाद मिळत नाही.