शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

कशी सुधारणार विद्यापीठाची गुणवत्ता?

By admin | Updated: November 19, 2015 03:44 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला ‘नॅक’चा ‘अ’ दर्जा मिळाला असला तरी प्रत्यक्षात अनेक संलग्नित विभागांमध्ये संशोधनाची पातळी हवी तशी वाढलेली नाही.

राष्ट्रीय पातळीवर संस्थेचा प्रस्ताव धूळीत : उदासीन भूमिकेमुळे आश्चर्यनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला ‘नॅक’चा ‘अ’ दर्जा मिळाला असला तरी प्रत्यक्षात अनेक संलग्नित विभागांमध्ये संशोधनाची पातळी हवी तशी वाढलेली नाही. राष्ट्रीय स्तरावरील पुरातत्त्व अभ्यास संस्था ‘आयजीएनसीए’ने (इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्टस्) महाराष्ट्रातील एका प्रकल्पासाठी विद्यापीठाकडे सहकार्य मागितले होते. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना यामुळे संशोधन आणि प्रत्यक्ष अभ्यासाची चांगली संधी मिळाली असती. परंतु गेल्या तीन महिन्यांपासून यासंबंधातील प्रस्ताव धूळखात पडला आहे. विद्यापीठाची अशी उदासीन भूमिका पाहता दर्जा कसा सुधारेल, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.‘आयजीएनसीए’कडून संपूर्ण देशात पाषाणांपासून बनलेल्या प्राचीन कलाकृतींची माहिती संकलित करण्यात येत आहे. आजच्या तारखेत देशातील आठ राज्यांमध्ये संस्थेचे काम सुरू आहे. महाराष्ट्रात अजूनपर्यंत काम सुरू झालेले नाही. राज्यातील कामाचे समन्वयक म्हणून विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास व पुरातत्त्व विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ.सुभाष साहूचे नाव ‘आयजीएनसीए’ने प्रस्तावित केले होते. यासंदर्भातील प्रस्ताव संस्थेतर्फे तीन महिन्यांपूर्वी पाठविण्यात आले होते. परंतु विद्यापीठातीलच एका अधिकाऱ्यांसोबत मतभेदामुळे या प्रस्तावाला अद्याप कुठलेही उत्तर देण्यात आलेले नाही. विद्यापीठाने उत्तर देण्याचे सौजन्यदेखील न दाखविल्याची खंत ‘आयजीएनसीए’चे प्रकल्प संचालक डॉ.बी.एल.मल्ला यांनी बोलून दाखविली.आश्चर्याची बाब म्हणजे जागतिक वारसा आठवड्यानिमित्त पुरातत्त्व विभागाचे दोन दिवसीय प्रदर्शन सुरू होणार असूून याचे उद्घाटन कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे करणार आहेत. यासंदर्भात कुलगुरूंशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)