येरखेडा येथील घराला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:09 IST2021-04-04T04:09:25+5:302021-04-04T04:09:25+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : न्यू येरखेडा, ता. कामठी येथील घराला आग लागल्याची घटना शनिवारी (दि. ३) रात्री ७.३० ...

A house in Yerkheda caught fire | येरखेडा येथील घराला आग

येरखेडा येथील घराला आग

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : न्यू येरखेडा, ता. कामठी येथील घराला आग लागल्याची घटना शनिवारी (दि. ३) रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घडली. घटनेच्या वेळी घरात कुणीही नसल्याने कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र, आगीत घरातील साहित्य जळाल्याने किमान सहा लाख रुपयांचे नुकसान झाले. ही आग शाॅर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आशिष महेश भनारे (४०) न्यू येरखेडा येथील प्रीती लेआउटमध्ये गिरी यांच्याकडे भाड्याने राहतात. ते शनिवारी दुपारी त्यांच्या कुटुंबीयांसह एका कार्यक्रमासाठी कामठी शहरात गेल्याने घरी कुणीही नव्हते. रात्री ७.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या बंद घरातून धूर निघत असल्याने शेजाऱ्यांना संशय आला. आत आग लागल्याचे स्पष्ट हाेताच कामठी (नवीन) पाेलिसांना सूचना देत कामठी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी घराच्या खिडक्या व दार उघडून आगीवर वेळीच नियंत्रण मिळविले. पाेलीस उपनिरीक्षक वारंगे व त्यांच्या सहकाऱ्यांनीही याकामी मदत केली. आग नियंत्रणात येईपर्यंत आतील जीवनावश्यक साहित्य, कपाट, कपडे, राेख रक्कम व इतर साहित्य जळाल्याने किमान सहा लाख रुपयांचे नुकसान झाले, अशी माहिती आशिष भनारे यांनी दिली. ही आग शाॅर्टसर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीत गॅस सिलिंडर सुरक्षित राहिल्याने अनर्थ टळला.

Web Title: A house in Yerkheda caught fire