नागपूरमध्ये प्रेमविवादातून भयावह घटना, अल्पवयीन भावंडांवर चाकूहल्ला; आरोपी अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 19:42 IST2026-01-09T19:41:18+5:302026-01-09T19:42:26+5:30
Nagpur : शहरात आज (९ जानेवारी) प्रेमसंबंधातून सुरू झालेल्या तणावातून दोन अल्पवयीन भावंडांवर झालेला चाकूहल्ल्याचा प्रकार समोर आला आहे.

Horrific incident in Nagpur due to love dispute, minor siblings stabbed; Accused arrested
नागपूर : शहरात आज (९ जानेवारी) प्रेमसंबंधातून सुरू झालेल्या तणावातून दोन अल्पवयीन भावंडांवर झालेला चाकूहल्ल्याचा प्रकार समोर आला आहे. घटनेनंतर परिसरातच दहशत पसरली असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही भीषण घटना शहरातील पिवळी नदी भागात घडली. काही काळापूर्वी एका मुलीचे शेजारच्या मुलासोबत मैत्री होती पण घरच्यांच्या हस्तक्षेपामुळे मुलीने त्या मुळाशी बोलणे बंद केले. त्यामुळे मुलीचे दुसऱ्या मुळाशी संबंध असल्याच्या संशय त्या मुलाला आला. त्यामुळे त्या मुलाचा मुलीच्या भावाशी वाद झाला आणि वादाचे रूपांतर हल्ल्यात झाले. त्याने मुलीच्या भावावर चाकूने हल्ला केला. मुलगी त्यात पडल्याने आरोपीने तिच्यावर सुद्धा निर्घृणपणे हल्ला केला. दोघेही भाऊ बहीण हल्ल्यात गंभीर जखमी असून तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनास्थळी पोहोचलेल्या यशोधरा नगर पोलिसांनी आरोपीला शोधून काही तासांतच ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून चाकू जप्त केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत आणि घटना कशी घडली याची सखोल चौकशी सुरू आहे.
या प्रकारामुळे परिसरात मानसिक अस्थिरता दिसून आली असून नागरिकांनीही पोलिसांच्या कारवाईची प्रशंसा केली आहे. जगातील काही प्रेमप्रकरणांतून उग्र वाद उद्भवणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालल्याची नोंद पोलिस व्यवस्थेने घेतली आहे.