शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

गुंडांचा हैदोस

By admin | Updated: July 6, 2015 03:19 IST

बिल्डरच्या जमिनीवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात उपराजधानीतील कुख्यात गुंडांनी शनिवारी दिवसाढवळ्या सोनेगाव परिसरात दरोडा घातला.

अभियंत्याला मारहाण : कोट्यवधीच्या जमिनीवर कब्जाचा प्रयत्ननागपूर : बिल्डरच्या जमिनीवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात उपराजधानीतील कुख्यात गुंडांनी शनिवारी दिवसाढवळ्या सोनेगाव परिसरात दरोडा घातला. तलवार, खंजीरचा धाक दाखवून अभियंत्याला मारहाण केली आणि रोख ५० हजारांसह किंमती चीजवस्तू हिसकावून नेल्या. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. सोनेगावच्या भामटी परिसरात नटराज को-आॅप सोसायटीची जागा नरेश बरडे नामक बिल्डरने विकत घेतली आहे. कोट्यवधीच्या या जागेची बनावट कागदपत्रे तयार करून दुसऱ्या एका गटाने त्या जागेवर आपली मालकी सांगितल्यामुळे बरडे आणि लोलगे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. संभाव्य धोका लक्षात घेता या जागेभोवती वॉल कंम्पाऊंडचे काम बिल्डरने सुरू केले. शनिवारी दुपारी ११.४५ च्या सुमारास कुख्यात सूरज लोलगे (प्रतापनगर), कार्तिक शर्मा (हावरापेठ), रोहित सिरसाठ (बोरगाव), पीयूष गौर (पार्वतीनगर), संदीप नाडे (रा. रहाटेनगर), अंकुश मिश्रा (रा. उथाननगर), ईवान राऊत (रा. पोलीस लाईन टाकळी), अजहर शेख (भूपेशनगर), दीपेंद्र नायक (बोरगाव), अब्दुल सरफराज (रा. भालदारपुरा), मंगल यादव आणि पापा यादव (एफसीआय गोदामाजवळ, अजनी) तसेच त्यांचे ४० ते ५० साथीदार या भूखंडावर पोहचले. त्यांच्याकडे तलवार, खंजीर, चाकू, रॉड आदी शस्त्रे होती. त्यांनी आरडाओरड आणि अश्लील शिवीगाळ करीत तेथील कामगारांना पळवून लावले. या ठिकाणी बांधकामाचे निर्देश देणारे अभियंता राहुल शिवाजी धोटे (वय ३५) यांना उपरोक्त गुंडांनी शस्त्रांचा धाक दाखवून मारहाण केली. त्यांच्याजवळचे रोख ५० हजार तसेच लॅपटॉप, चार्जर, रेनकोट, डोंगल हिसकावून घेतले. सुमारे अर्धा तास त्यांचा हैदोस सुरू होता. यामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. फोन करून कुणीतरी माहिती कळवल्यामुळे सोनेगाव पोलिसांचा ताफा घटनास्थळी धावला. ते पाहून गुंडांनी वेगवेगळ्या दिशेने पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून काहींना सोनेगाव तर काहींना प्रतापनगर परिसरात पकडले.(प्रतिनिधी)ठाण्याच्या परिसरातून पळाले आरोपीया गुंडांना सोनेगाव ठाण्यात आणण्यात आले. पोलीस घाईगडबडीत असल्याचे पाहून यातील सूरज लोलगेसह दोन आरोपी पळून गेले. तर, मंगल आणि पापा यादवसह काही आरोपी अजनी परिसरात असूनही पोलिसांनी त्यांना अटक करण्याचे टाळल्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. सूत्रधार फरार, साथीदारांचा पीसीआरकोट्यवधींच्या जमिनीच्या वादातून घडलेल्या या दरोड्याच्या गुन्ह्याचा सूत्रधार सूरज लोलगे आणि मंगल यादव असल्याचा आरोप बिल्डर नरेश बरडे यांचे वकील अ‍ॅड. निशांत सिंघानिया यांनी केला. सूत्रधार गुंड आपल्या साथीदारांसह फरार असून, अटक केलेल्या नऊ आरोपींना पोलिसांनी कोर्टात हजर करून त्यांचा ७ जुलैपर्यंत पीसीआर मिळवला.