शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
4
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
5
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
6
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
7
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
8
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
9
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
10
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
11
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
12
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
13
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
14
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
15
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
16
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
17
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
18
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
19
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
20
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
Daily Top 2Weekly Top 5

हा देशातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान

By admin | Updated: January 7, 2015 01:15 IST

वृत्तपत्रांच्या माध्यमातून नागरिकांच्या घरापर्यंत अवघे जग पोहोचते. वृत्तपत्रे लोकांच्या घरापर्यंत पोहोचविणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांना कधीच मान मिळत नाही, ओळख मिळत नाही, ही खंत नेहमी वाटायती.

गजानन मेश्राम गहिवरले : सेवा-सचोटीचे प्रतीकनागपूर : वृत्तपत्रांच्या माध्यमातून नागरिकांच्या घरापर्यंत अवघे जग पोहोचते. वृत्तपत्रे लोकांच्या घरापर्यंत पोहोचविणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांना कधीच मान मिळत नाही, ओळख मिळत नाही, ही खंत नेहमी वाटायती. परंतु ‘लोकमत’ने वृत्तपत्र विक्रेत्या बंधूंच्या शिल्पकृतीला केवळ साकारलेच नाही तर त्याचे लोकार्पण करण्याचा मान माझ्यासारख्या वृत्तपत्र विक्रेत्याला दिला. ही ऐतिहासिक बाब असून हा केवळ माझाच नाही तर देशातील प्रत्येक वृत्तपत्र विक्रेत्याचा सन्मान आहे, हे सांगत असताना ५० वर्षांपासून हे कार्य करणाऱ्या गजानन मेश्राम या ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्याच्या डोळ्यातील भाव बरेच काही सांगून गेले.वृत्तपत्र विक्रेता बंधंूच्या कष्टाला सलाम करण्यासाठी लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने साकारण्यात आलेल्या देशातील पहिल्या ‘वृत्तपत्र विक्रेता बंधंूच्या शिल्पकृती’चे लोकार्पण मंगळवारी ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते गजानन मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मेश्राम यांनी मनातील भावना व्यक्त केल्या. शिक्षण चौथ्या वर्गापर्यंतच झाले असले तरी वृत्तपत्र वाचनाची आवड होतीच. मी २६ व्या वर्षी वृत्तपत्र वाटपाचे काम सुरू केले. त्यावेळी ४० घरी सकाळी वृत्तपत्र वाटप करायचो. थंडी असो, पाऊस असो अव्याहतपणे मी माझे काम सुरूच ठेवले. आज वयाच्या ७६ व्या वर्षीदेखील मी सायकलने दररोज २०० घरी वृत्तपत्र वाटतो. ५० वर्षे सतत मेहनत केली अन् त्याचे फळ आज मिळाले, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)वाचकांचे समाधान महत्त्वाचेमेश्राम यांनी गेल्या पाच दशकात अनुभवलेल्या वृत्तपत्र क्षेत्रातील स्थित्यंतरावरदेखील भाष्य केले. अनेक वृत्तपत्रे आली, काही बंद पडली तर काहींनी अत्युच्च शिखरे गाठली. वृत्तपत्रांच्या कार्यप्रणालीतदेखील भरपूर बदल झाले. परंतु एक गोष्ट आजही कायम आहे; ती म्हणजे सकाळच्या वेळी वाचकांची वृत्तपत्र वाचण्यासाठीची तळमळ. एखादे दिवशी वृत्तपत्र उशिरा आले तर वाचक बेचैन होतात अन् ते दरवाजावर उभे राहून प्रतीक्षा करतात. ५० वर्षांपूर्वीदेखील असेच चित्र होते व आजही ते दिसून येते. अशा वाचकांच्या हाती वृत्तपत्राचा अंक पडल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील समाधानाचे भाव नवीन स्फूर्ती देतात, अशा भावना मेश्राम यांनी व्यक्त केल्या.७६ व्या वर्षी सायकलभ्रमंती७६ वर्षीय गजानन मेश्राम यांच्याशी संवाद साधला असता त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील एक अनोखा पैलू समोर आला. ज्या सायकलवरून ते दररोज पेपर वाटप करतात, त्यावरून भ्रमंती करण्याची त्यांची आवड आहे. सुटीच्या दिवशी ते बरेच अंतर सायकलवरून फिरून येतात. मध्य प्रदेशातील बालाघाट, शिवनी इत्यादी ठिकाणी ते सायकलनेच प्रवास करतात. मागील वर्षी त्यांनी साकोली येथील एका लग्नसमारंभात सायकलने प्रवास करून उपस्थिती लावली होती, हे विशेष.