शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पुन्हा हिट अँड रन : नागपूर - वर्धा रोडवर बीएमडब्ल्यूच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू; आरोपी फरार

By शुभांगी काळमेघ | Updated: June 9, 2025 20:03 IST

Nagpur : बेलतरोडी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु

नागपूर :नागपूर शहरातील वर्धा रोडवर पुन्हा एकदा एक भीषण अपघात घडला आहे. शनिवारी ८ जूनच्या रात्री एका २५ वर्षीय तरुणाचा बीएमडब्लू चालकाच्या कचाट्यात येऊन अपघाती मृत्यू झाला. माहितीनुसार, आरोपीने बीएमडब्ल्यू कार वेगाने चालवत असताना या अपघाताची घटना घडली. अपघातानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला, ज्यामुळे या प्रकरणात गंभीर वाद निर्माण झाला आहे. 

मृत तरुणाचे नाव योगेश बोपचे (२५) आहे. तो एम्समध्ये भरती असलेल्या त्याच्या नातेवाईकाला टिफिन देऊन येत असतांना हा अपघात घडला. रात्री ३.१५ वाजताच्या सुमारास चिंचभवन परिसराच्या जवळ बीएमडब्लू (HP ८९/A १५९२) भरधाव वेगाने येऊन योगेश आणि त्याच्या नातेवाईकाच्या दुचाकीला धडकली. अपघात इतका भीषण होता की ते दोघेही हवेत उडत रस्त्यावर पडले. 

उपस्थित लोकांच्या सांगण्यानुसार अपघातानंतर बीएमडब्लू चालक पळाला. अपघातानंतर दोघांना एम्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, डॉक्टरांनी योगेशचा रस्त्यानेच मृत्यू झाल्याचे घोषित केले तर त्याच्यासोबत असलेले नातेवाईक मृत्युसोबत झुंज देत आहेत. बेलतरोडी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध लागण्याची आशा आहे. 

या घटनेमुळे नागपूर शहरात उच्चभ्रू व्यक्तींच्या मद्यपान करून वाहन चालवण्याच्या प्रकरणांबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, आरोपीला लवकरात लवकर अटक करून न्यायालयात हजर करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

टॅग्स :AccidentअपघातnagpurनागपूरBmwबीएमडब्ल्यू