शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

इतिहासाचा अभ्यास आवश्यक, दडपण नको

By admin | Updated: June 29, 2015 03:12 IST

मानवी जीवनाच्या उन्नतीसाठी इतिहास आणि त्याचा अभ्यास आवश्यक आहे. पण इतिहास फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही.

श्री.मा. भावे : इतिहासाचे लेखन आणि पुनर्लेखन का आणि कसे? विषयावर व्याख्यान नागपूर : मानवी जीवनाच्या उन्नतीसाठी इतिहास आणि त्याचा अभ्यास आवश्यक आहे. पण इतिहास फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही. कारण इतिहासात घडलेल्या घटना आपण पाहिलेल्या नसतात आणि त्याचे लेखन करणाऱ्या इतिहासकाराकडून त्याची मते आणि विश्लेषण होण्याचा संभव व शक्यता नाकारता येत नाही. या शक्यतांचा निवाडा करणे इतिहासाच्या बाबतीत गरजेचे आहे. त्यामुळेच इतिहास नेहमीच महत्त्वाचा ठरतो. पण इतिहासाचे दडपण घेऊन वागणे मात्र समाजहिताचे नाही, असे मत पुण्याच्या भारत इतिहास मंडळाचे सचिव आणि ज्येष्ठ संपादक डॉ. श्री. मा. भावे यांनी केले. प्रगतिशील लेखक संघ, विदर्भ सांस्कृतिक परिषद आणि धरमपेठ राजाराम वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इतिहासाचे लेखन आणि पुनर्लेखन का आणि कसे?’ विषयावर त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी उपस्थित होते. डॉ. भावे म्हणाले, इतिहास भावी पिढ्यांच्या भविष्यासाठी आणि समाजाला उन्नत करण्यासाठी महत्त्वाचा असतो. पण इतिहासाने निर्माण केलेले प्रश्न इतिहासातच शोधण्याचा प्रयत्न करताना अकारण वर्तमानात अनेक अपसमज निर्माण होतात. त्यापेक्षा इतिहासाच्या अभ्यासातून आपले वर्तमान सकारात्मकतेने बदलविण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. इतिहासाचे सारेच लेखन खरे आहे, असे मानण्यातही फारसा अर्थ नाही. व्यक्ती आणि कालसापेक्ष बदल इतिहासात होतात. नेपोलियन हरला किंवा बखर लिहिणाऱ्यांचा नेमका हेतू काय? हे समजून घेणेही आवश्यक आहे. जर्मनीच्या रांके या इतिहासकाराने इतिहास लिहिताना सर्व दस्तावेज आणि पुरावे तपासूनच लेखन करावे, असा सिद्धांत मांडला. पण मार्क्सने इतिहासाचे सूत्र शोधून तो उलगडण्याचा प्रयत्न करावा, असा सिद्धांत मांडला. उत्पादनाची साधने बदलली की समाजात परिवर्तन होते. या परिवर्तनाचा विचार इतिहासात असला पाहिजे, असे मत त्याने व्यक्त केले होते. याशिवाय देश, स्थलकाल आणि संस्कृतीसापेक्षतेनेही इतिहासात बदल होतो. त्यामुळे या साऱ्याच घटकांचा विचार करणे भाग आहे. यासाठी त्यांनी अनेक जागतिक उदाहरणांनी हा विषय समजावून सांगितला. याप्रसंगी डॉ. श्रीपाद चितळे यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. जोशी म्हणाले, कुठलाही गर्व न बाळगता आपला इतिहास शोधता येतो, हे भावे यांनी उलगडले आहे.इतिहासात आपले मूळ शोधण्याचा प्रयत्न करताना आपण आपले वर्तमानही शोधतो. त्यामुळेच इतिहासाकडे आपण निकोप दृष्टीने पाहू शकत नाही. (प्रतिनिधी)