शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

हिंगण्यात दोन मंगल कार्यालयांना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:12 IST

हिंगणा : लग्नसमारंभात क्षमतेपेक्षा जास्त गर्दीस परवानगी देणाऱ्या हिंगणा तालुक्यातील दोन मंगल कार्यालयावर तहसील प्रशासनाच्या भरारी पथकाने मंगळवारी धाड ...

हिंगणा : लग्नसमारंभात क्षमतेपेक्षा जास्त गर्दीस परवानगी देणाऱ्या हिंगणा तालुक्यातील दोन मंगल कार्यालयावर तहसील प्रशासनाच्या भरारी पथकाने मंगळवारी धाड टाकत दंडात्मक कारवाई केली. यात वानाडोंगरी येथील बाबडे सभागृह आणि हिंगणा येथील रेणुका सभागृहाचा समावेश आहे. या दोन्ही मंगल कार्यालयात कोविड नियमाचे सर्रास उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला मिळताच ही कारवाई करण्यात आली.

जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक जास्त संक्रमण हिंगणा तालुक्यात झाले आहे. असे असतानाही तालुक्यातील काही मंगल कार्यालयात आयोजित करण्यात येणाऱ्या लग्नसमारंभात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.

तहसील प्रशासनाच्या भरारी पथकाने मंगळवारी या मंगल कार्यालयाची तपासणी केली असता, येथे प्रवेशद्वारावर थर्मल स्कॅनिंगची सुविधा दिसून आली नाही. यासोबतच कार्यालयाच्या क्षमतेपेक्षा ५० टक्क्याहून अधिक नागरिकांची येथे गर्दी दिसून आली. येथे अनेक नागरिकांचा विना मास्क वावरही दिसून आला. यासोबतच मंगल कार्यालयात उपस्थित नागरिकांकडून फिजिकल डिस्टन्सिंगचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे या दोन्ही मंगल कार्यालयाचे व्यवस्थापक आणि आयोजकावर आर्थिक दंडात्मक कारवाई करण्यात आली. येथे दोन्ही ठिकाणाहून ३० हजाराचा दंड वसूल करण्यात आला. यासोबतच कोविड-१९ नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बाबडे सभागृहावर एक लाख रुपये तर रेणुका सभागृह प्रशासनाला ५० हजार रुपये दंड तसेच साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६० तसेच भादंविच्या कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजाविण्यात आली. उपरोक्त कारवाई हिंगण्याचे तहसीलदार संतोष खांडरे यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार महादेव दराडे, वानाडोंगरीचे मंडळ अधिकारी राजेश चुटे, तलाठी सतीश तिवारी आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.

----

बाबडे आणि रेणुका सभागृहात कोविड नियमाचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी तहसील प्रशासनाला मिळाल्या होत्या. प्रशासनाच्या भरारी पथकाने केलेल्या तपासणीत हे दिसून आले. त्यामुळे दोन्ही मंगल कार्यालयावर दंडात्मक कारवाई केली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनाही नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. यापुढे तालुक्यात मंगल कार्यालय आणि लॉनवर क्षमतेपेक्षा जास्त गर्दी आढळल्यास ते सील केले जातील.

- संतोष खांडरे, तहसीलदार, हिंगणा