शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

सेवेचा परमोच्च बिंदू म्हणजे ईश्वरप्राप्ती  : जयवंत बोधले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 00:39 IST

मातृपितृसेवा, समाजसेवा आणि राष्ट्रसेवा अशा विविध माध्यमातून केली जाणारी सेवा अंतिमत: परमेश्वराच्या चरणीच रुजू होते. सेवाधर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. सेवेचा परमोच्च बिंदू म्हणजे ईश्वरप्राप्ती आहे, असे प्रतिपादन वारकरी संप्रदायातील संतश्रेष्ठ मानकुजी महाराज बोधले यांचे वंशज अ‍ॅड. जयवंत बोधले यांनी केले.

ठळक मुद्दे‘सेवाधर्माचा परिणाम’वरील त्रिदिवसीय व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मातृपितृसेवा, समाजसेवा आणि राष्ट्रसेवा अशा विविध माध्यमातून केली जाणारी सेवा अंतिमत: परमेश्वराच्या चरणीच रुजू होते. सेवाधर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. सेवेचा परमोच्च बिंदू म्हणजे ईश्वरप्राप्ती आहे, असे प्रतिपादन वारकरी संप्रदायातील संतश्रेष्ठ मानकुजी महाराज बोधले यांचे वंशज अ‍ॅड. जयवंत बोधले यांनी केले. सच्चिदानंद मंडळातर्फे सायंटिफिक सभागृहात आयोजित ‘सेवाधर्माचा परिणाम’ या विषयावरील त्रिदिवसीय व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते.नागपूर जिल्ह्यातील संत श्री भैयाजी महाराज रचित ‘अध्यात्मपर प्रार्थना स्तोत्र’ या ग्रंथातील सेवाधर्माचा परिणाम या विषयावर ही त्रिदिवसीय व्याख्यानमाला आयोजित आहे. सेवेच्या फळप्राप्ती आणि ब्रह्मज्ञानाचा संबंधही अल्पशब्दांत त्यांनी यावेळी विवेचित केला. सेवाधर्म व प्रार्थना आध्यात्मिक स्वरूपात भगवंताकडे केली असता साधकाला त्याचा लाभ होतोच, असे अ‍ॅड.जयवंत बोधले म्हणाले. प्रपंचात राहून सेवा करणे आणि परमार्थात राहून सेवा करणे यातील भिन्नतेचे विश्लेषण त्यांनी केले. विवेचनात त्यांनी श्रीज्ञानेश्वरी आणि प्रार्थनास्तोत्रातील ओळींचा आधार घेत विषयवस्तू मांडले.यावेळी राजे रघुजी भोसले (पंचम), शिवशक्तीपीठ उमरेडचे शिवयोगी दत्तामहाराज जोशी, श्रीरामपंत जोशी महाराज आणि गोंदवलेकर महाराजांचे नामधारक बाबासाहेब कुळकर्णी यांची विशेष उपस्थिती होती. अ‍ॅड.मिलिंद केदार यांनी प्रास्ताविक केले तर अंजली पाठक यांनी संचालन केले. यावेळी जिव्हाळा फाऊंडेशनच्या विद्यार्थिनींनी ‘बेटी बचाओ’चा जागर केला.

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर