शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

हायकमांडने पाहिजे तशी मदत केली नाही  : विजय वडेट्टीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 20:08 IST

विधानसभा निवडणुकीत हायकमांडने पाहिजे तशी मदत केली नाही. काँग्रेस नेत्यांच्या सभा मागितल्या, पण मिळाल्या नाहीत. या सभांनी राज्यात वातावरण निर्मितीत भर पडली असती व काँग्रेसच्या २५ जागा वाढल्या असत्या, अशा शब्दात काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसला घरचा अहेर दिला आहे.

ठळक मुद्देतर काँग्रेसच्या २५ जागा वाढल्या असत्या

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीत हायकमांडने पाहिजे तशी मदत केली नाही. काँग्रेस नेत्यांच्या सभा मागितल्या, पण मिळाल्या नाहीत. राहुल गांधी यांच्या काही सभा मिळाल्या. प्रियंका गांधी यांच्या ५५ सभा मागितल्या होत्या. मात्र, एकही सभा मिळाली नाही. या सभांनी राज्यात वातावरण निर्मितीत भर पडली असती व काँग्रेसच्या २५ जागा वाढल्या असत्या, अशा शब्दात काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसला घरचा अहेर दिला आहे.नागपुरात मंगळवारी पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, आम्ही निवडणुकीला गांभीर्याने सामोरे गेलो नाही. आम्ही बॅकफूटवर होतो. ही निवडणूक जिंकू शकलो असतो पण कुणालाच अंदाज आला नाही. विदर्भात काही जागा आम्ही चुकीच्या पद्धतीने वाटल्या. मी स्वत: व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात नवीन होतो. आम्हाला उमेदवारांचा अंदाज आला नाही. अभ्यास करायला पुुरेसा वेळ मिळाला नाही. शिवाय साधनसामुग्रीत आम्ही कमी पडलो. नाहीतर विदर्भात आणखी १० जागा वाढल्या असत्या, अशी खंतही वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार