शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

आता कोरोना लसीची ‘हेटेरोजीनस् ट्रायल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:12 IST

सुमेध वाघमारे नागपूर : कोरोनाचा संकटावर मात करण्यासाठी प्रतिबंधक लसीकरणाच्या मोहिमेला गती देण्यात आली आहे. कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन व स्पुतनिक ...

सुमेध वाघमारे

नागपूर : कोरोनाचा संकटावर मात करण्यासाठी प्रतिबंधक लसीकरणाच्या मोहिमेला गती देण्यात आली आहे. कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन व स्पुतनिक ही लस दिली जात आहे. या सर्व लसी इंजेक्शनमधून दिली जात आहे. आता लवकरच ‘हेटेरोजीनस्’ पद्धतीने सुद्धा दिली जाणार आहे. तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी ही पद्धत प्रभावी ठरणार असल्याने भारतात नागपूरसह लखनऊ, बेळगाव, हैद्राबाद या ठिकाणी मानवी चाचणीला मंजुरी मिळाली आहे.

देशात कोरोना लसीसंदर्भात बरेच प्रयोग सध्या सुरू आहेत. इंजेक्शनद्वारे देण्यात येणाऱ्या लसीव्यतिरिक्त नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीची चाचणी सुरू आहे. हैद्राबादच्या भारत बायोटेक कंपनीची ‘कोव्हॅक्सिन’ लसीची मानवी चाचणी महाराष्ट्रात केवळ नागपुरातील गिल्लुरकर हॉस्पिटलमध्ये झाली. डॉ. चंद्रशेखर गिल्लुरकर यांच्या मार्गदर्शनात या चाचणीचे दोन्ही टप्पे यशस्वी पार पाडले. त्यानंतर नाकावाटे देण्यात येणाऱ्या ‘नेझल व्हॅक्सिन’ चाचणीचा पहिला टप्पा याच हॉस्पिटलमध्ये पूर्ण होऊन त्याचे चांगले निष्कर्ष पुढे आले आहेत. याचा दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची मंजुरीची प्रतीक्षा असताना भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हॅक्सिनचा ‘हेटेरोजीनस् ट्रायल’ला ‘केंद्रीय ड्रग्ज कंट्रोलर जनरल’ने मंजुरी दिली आहे.

-काय आहे ‘हेटेरोजीन स्ट्रायल’

डॉ. गिल्लूरकर यांनी सांगितले, कोरोनाची एकच लस दोन वेगवेगळ्या पद्धतीने देण्याचा प्रकाराला ‘हेटेरोलोगस’ किंवा ‘हेटेरोजीनस्’ म्हटले जाते. भारतात केवळ ‘इन्ट्रामस्क्युलर’ म्हणजे इंजेक्शनद्वारे कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. ‘नेझल व्हॅक्सिन’ला अद्याप मंजुरी मिळाली नाही. ‘हेटेरोजीनस् ट्रायल’मध्ये एक लस नाकावाटे तर दुसरी लस इंजेक्शनद्वारे दिली जाते.

-२०० स्वयंसेवकावर होणार चाचणी

नागपुरातील गिल्लूरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये या चाचणीला शुक्रवारपासून सुरुवात झाल्याचे सांगत डॉ. गिल्लूरकर म्हणाले, भारतातील चारही सेंटरवर प्रत्येकी ५० असे एकूण २०० स्वयंसेवकावर ही चाचणी होत आहे. १८ ते ६० वयोगटात होणारी ही चाचणी चार गटात विभागण्यात आली आहे. पहिल्या गटात १३ स्वयंसेवकांना पहिली लस नाकावाटे तर २८ दिवसांनी दुसरी लस इंजेक्शनद्वारे दिली जाईल. दुसऱ्या गटात १३ स्वयंसेवकांना पहिली लस इंजेक्शनद्वारे तर दुसरी लस नाकावाटे, तिसऱ्या गटात १२ स्वयंसेवकांना दोन्ही लस नाकावाटे तर चौथ्या गटात १२ स्वयंसेवकांना दोन्ही लस इंजेक्शनद्वारे दिली जाईल. याचा अभ्यास करून निष्कर्ष काढला जाईल.

-तिसऱ्या लाटेला रोखण्यात प्रभावी ठरणार! (फोटो आहे)

‘हेटेरोजीनस् ट्रायल’ प्राण्यांमध्ये खूप यशस्वी झाली आहे. विशेष म्हणजे, नाकावाटे दिलेल्या लसीमुळे कोरोनाचा विषाणूला तत्काळ नाकातच रोखण्यात यश येते तर दुसऱ्या डोस हा इंजेक्शनने दिल्यामुळे लांब कालावधीपर्यंत त्याचा प्रभाव दिसून येतो. यामुळे तिसऱ्या लाटेला रोखण्यात ही पद्धत यशस्वी ठरण्याची दाट शक्यता आहे.

-डॉ. चंद्रशेखर गिल्लुरकर, संचालक गिल्लुरकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नागपूर