शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीला दोषी ठरवण्यासाठी ढीगभर पुराव्यांची गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:17 IST

राकेश घानोडे नागपूर : भारतीय पुरावा कायद्यामध्ये गुन्हे सिद्ध करण्यासाठी किती पुरावे लागतील, याची संख्या निश्चित करून देण्यात ...

राकेश घानोडे

नागपूर : भारतीय पुरावा कायद्यामध्ये गुन्हे सिद्ध करण्यासाठी किती पुरावे लागतील, याची संख्या निश्चित करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे आरोपीला त्याच्याविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यासाठी ढीगभर पुराव्यांची गरज नाही. विश्वासार्ह असलेल्या एकमेव पुराव्याच्या आधारावरही आरोपीला दोषी ठरवले जाऊ शकते, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका खून प्रकरणावरील निर्णयात नोंदवून आरोपीची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली.

न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला. अशोक किसन कन्नाके (४२) असे आराेपीचे नाव असून तो गोधनी, ता. उमरेड येथील रहिवासी आहे. सासऱ्याचा खून आणि सासू व पत्नीला गंभीर जखमी करण्याच्या गुन्ह्यामध्ये या आरोपीला सत्र न्यायालयाने १२ ऑगस्ट २०१६ रोजी जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावली, तसेच २० वर्षे कारावास भोगल्याशिवाय त्याला शिक्षेत सूट देण्यास मनाई केली. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. सासूचे बयाण विश्वासार्ह नाही. तिच्या बयाणामध्ये विरोधाभास आहे. त्यामुळे सत्र न्यायालयाने केवळ सासूच्या बयाणावरून शिक्षा सुनावून चूक केली, असा दावा आरोपीने अपिलावरील अंतिम सुनावणीदरम्यान केला. उच्च न्यायालयाने आरोपीचा हा दावा वरील निरीक्षण नोंदवून अमान्य केला आणि सासूच्या बयाणाचा एकमेव पुरावाही आरोपीला या गुन्ह्यामध्ये दोषी ठरवण्यासाठी पुरेसा आहे, असे स्पष्ट केले.

-----------------

अशी घडली घटना

आरोपीच्या सासऱ्याचे नाव मधुकर गेडाम होते. सासूचे नाव चंद्रभागा, तर पत्नीचे नाव पुष्पा आहे. आरोपीला दारूचे व्यसन होते. तो पुष्पाचा छळ करीत होता. त्यामुळे पुष्पा २५ जानेवारी २०१५ राेजी उदासा येथील माहेरी आली होती. आराेपीने दुसऱ्या दिवशी तेथे जाऊन पुष्पाला घरी परत येण्यासाठी धमकावले. दरम्यान, चंद्रभागाने जशास तसे उत्तर दिल्यानंतर आरोपी निघून गेला. ३० जानेवारी रोजी रात्री आरोपीने तिघांवरही कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यात मधुकरचा मृत्यू झाला.