शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सुविधेची जबाबदारी आरोग्य विभागाची नाही

By admin | Updated: July 16, 2016 03:01 IST

आदिवासी विकास विभागातर्फे सार्वजनिक आरोग्य विभागाला दरवर्षी अनुदान वाटप करण्यात येते.

हायकोर्टात प्रतिज्ञापत्र : आदिवासी विभागाचा नकार नागपूर : आदिवासी विकास विभागातर्फे सार्वजनिक आरोग्य विभागाला दरवर्षी अनुदान वाटप करण्यात येते. या अनुदानातून दुर्गम भागातील आदिवासींना आवश्यक आरोग्य सुविधा पुरविणे अपेक्षित आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग या क्षेत्रातील तज्ज्ञ आहे. यामुळे अनुदानातून आदिवासींचे जीवन संरक्षण करणे त्यांचे कर्तव्य आहे असे उत्तर आदिवासी विकास विभागातर्फे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात राहणारे आदिवासी दर्जेदार वैद्यकीय सुविधांपासून वंचित आहेत याकडे लक्ष वेधणारी जनहित याचिका मोहन कारेमोरे यांनी दाखल केली आहे. या प्रकरणात हे उत्तर सादर करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने आदिवासी विकास विभागाकडून मिळणाऱ्या अनुदानातून दुर्गम भागातील आदिवासींना रुग्णालये, तज्ज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित परिचारिका, कर्मचारी, रुग्णवाहिका, वैद्यकीय उपकरणे, औषधी इत्यादी आवश्यक बाबी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. अनुदानाची रक्कम आरोग्य सेवा वगळता अन्य दुसऱ्या कामांसाठी उपयोगात आणली जाऊ नये अशी अपेक्षा असते असेही उत्तरात स्पष्ट करण्यात आले आहे. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता याचिकेवर आठ आठवड्यांनंतर पुढील सुनावणी निश्चित केली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अशोक रघुते यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी) काय आहे याचिकाकर्त्याचे म्हणणे गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा, एटापल्ली इत्यादी भागात चांगले रस्ते नाहीत. दर्जेदार रुग्णालये व रुग्णवाहिका नाही. यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. अनेकांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू होतो. काही महिन्यांपूर्वी एका महिलेला जुळी मुले झाली होती. मुलांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना नागपुरात आणण्यात येत होते. यापैकी एका मुलाचा वाटेतच मृत्यू झाला तर, दुसरा मुलगा रुग्णालयात दगावला. आरोग्य सेवेसाठी येणारा निधी दुर्गम भागापर्यंत पोहोचत नाही. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. रुग्णांना सेवा देताना कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.