शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीला पळवून घेऊन गेला; पोलिसांनी पकडल्यावर त्याने लॉकअपमध्येच जीव दिला, आई - वडिलांचे पोलिसांवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 16:30 IST

Nagpur : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात अटक केलेल्या एका आरोपीने जरीपटका पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये गळफास घेत आत्महत्या केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात अटक केलेल्या एका आरोपीने जरीपटका पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

नागेंद्रकुमार रामजी भारतीया (२०, मदारीपूर, प्रयागराज, उत्तर प्रदेश) असे मृत आरोपीचे नाव आहे. तो विज्ञान शाखेचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता. त्याने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अल्पवयीन मुलीशी संपर्क केला व तिच्याशी बोलू लागला. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने तिला लग्न करू, अशी गळ घातली. तो डिसेंबर महिन्यात नागपुरातदेखील आला होता. त्याने तिला पळून जाण्यासाठी जिद्द केली वआठवड्याभराअगोदर नागपुरात येऊन त्याने तिला घेऊन पळ काढला. अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी सगळीकडे शोधाशोध केली; मात्र ती कुठेच न सापडल्याने जरीपटका पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत शोधमोहीम राबविली. तपासादरम्यान मुलगी प्रयागराजला असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने नागेंद्रला अटक केली व मुलीला तिच्या कुटुंबीयांच्या हवाली केले. त्याला बुधवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले व दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.

थंडीचा कालावधी असल्याने त्याला अंगावर ओढायला चादर दिली होती. पहाटेच्या सुमारास फारसा बंदोबस्त नसताना नागेंद्र उठला व त्याने चादर फाडली. शौचालयातून लपवून डबा आणला व त्यावर चढून चादर लॉकअपच्या रॉडला बांधली. त्यानंतर त्याने गळफास घेतला. काही वेळाने पोलिस कर्मचारी तेथे पोहोचला असता त्याला नागेंद्र गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना तातडीने याची माहिती देण्यात आली. ही बातमी वाऱ्यासारखी पोलिस वर्तुळात पसरली. जरीपटका पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी लक्ष न ठेवल्याने हा प्रकार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मृताच्या आईला चक्कर, वडिलांचे पोलिसांवर आरोप

दरम्यान, मृत नागेंद्रचे आईवडीलदेखील नागपुरात पोहोचले. मुलाच्या आत्महत्येची माहिती कळताच त्याच्या आईने ठाण्यासमोरच आक्रोश केला व तिला चक्कर आली. तर पोलिसांनी आम्हाला मुलाच्या मृत्यूची कुठलीही माहिती दिली नाही. मुलीच्या नातेवाइकांनी प्रकरणात तडजोड करण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली होती. तेच पैसे घेऊन आम्ही नागपूरला आलो होतो. लॉकअपमध्ये मुलाने जीव दिल्याने ही पूर्णतः पोलिसांचीच जबाबदारी आहे, असा आरोप त्याचे वडील रामजी यांनी केला.

एकाही कर्मचाऱ्याचे लक्ष कसे नाही?

आरोपीचे वय कमी असले तरी त्याने केलेल्या प्रकारामुळे पोक्सो व अपहरणाचा गुन्हा त्याच्याविरोधात दाखल करण्यात आला होता. त्यामुळे तो हादरला होता. लॉकअपमध्ये आरोपींवर लक्ष ठेवणे ही सर्वस्वी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची जबाबदारी असते. मात्र, नागेंद्रने चादर फाडली, शौचालयातून डबा आणला व तरीदेखील एकाही कर्मचाऱ्याचे याकडे लक्ष गेले नाही, ही बाब अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहे. या प्रकरणात आता सीआयडीकडून तपास करण्यात येत आहे. सीआयडीच्या पथकाने ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज, स्टेशन डायरी व इतर तपशील ताब्यात घेतले आहेत.

ठाण्याचे दरवाजे केले बंद

लॉकअपमध्ये कैद्यांवर लक्ष देण्याची जबाबदारी राहुल चव्हाण, प्रमोद दुधकावरे, अभय काकोडे यांच्यावर होती. तर नितीन आत्राम हे ड्यूटी अधिकारी होते. त्यांची सीआयडीकडून चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान, सीआयडीचे पथक घटनास्थळी येईपर्यंत जरीपटका पोलिस ठाण्यातील प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. त्यामुळे नागेंद्रच्या पालकांनादेखील बराच वेळ आत जाता आले नाही.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणेnagpurनागपूरjailतुरुंग