शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

वडिलांचे दु:ख विसरून तो अभ्यासाला लागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2018 4:08 PM

घरातील परिस्थिती हलाखीची असूनही सौरभने मात्र अभ्यासाचे समर्पण कमी होऊ दिले नाही. मात्र एक दु:खाचा डोंगर कोसळला आणि त्याचा विश्वास ढळला. तुटपुंज्या कमाईने का होईना, कुटुंबाला आधार देणाऱ्या वडिलांचा ऐन दिवाळीत मृत्यू झाला आणि तो कोलमडला. खिन्न झालेल्या सौरभचे हातही सुन्न पडल्याने अभ्यासही थांबला होता. अशावेळी इंजिनिअरिंग करणाºया मोठ्या भावाने त्याला धीर दिला व वडिलांसाठी यश मिळविण्याची शपथ दिली. तो पुन्हा उठला आणि अभ्यासाला लागला. दहावीचा निकाल लागला तेव्हा त्याच्याही डोळ्यात अश्रू आले. हे यश पाहण्यासाठी वडील असते तर...

ठळक मुद्देपरिस्थितीवर मात करून मिळविले ८२ टक्के : डॉक्टर होण्याची इच्छा

निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरातील परिस्थिती हलाखीची असूनही सौरभने मात्र अभ्यासाचे समर्पण कमी होऊ दिले नाही. मात्र एक दु:खाचा डोंगर कोसळला आणि त्याचा विश्वास ढळला. तुटपुंज्या कमाईने का होईना, कुटुंबाला आधार देणाऱ्या वडिलांचा ऐन दिवाळीत मृत्यू झाला आणि तो कोलमडला. खिन्न झालेल्या सौरभचे हातही सुन्न पडल्याने अभ्यासही थांबला होता. अशावेळी इंजिनिअरिंग करणाºया मोठ्या भावाने त्याला धीर दिला व वडिलांसाठी यश मिळविण्याची शपथ दिली. तो पुन्हा उठला आणि अभ्यासाला लागला. दहावीचा निकाल लागला तेव्हा त्याच्याही डोळ्यात अश्रू आले. हे यश पाहण्यासाठी वडील असते तर...विद्या साधना कॉन्व्हेंट, जयताळा येथे शिकणाऱ्या सौरभ अरुण बागडे या विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत ८२ टक्के गुण मिळविले आहेत. कठीण अवस्थेमध्ये मिळविलेल्या या गुणांची तुलना होऊ शकत नाही. सौरभ हा गरीब कुटुंबातील. वडील एमआयडीसीमध्ये एका फर्निचर कंपनीत कामाला होते. त्याचा मोठा भाऊ अजय इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षाला आहे. सौरभ हुशार असल्याने तो चांगले गुण घेईल, असा सर्वांना विश्वास होता. शाळेनेही त्याला खूप सहकार्य केले. नियमित अभ्यास करणे हे त्याचे ब्रीदच होते. त्यामुळे सुरुवातीपासून त्याने अभ्यासात खंड पडू दिला नाही. मात्र ऐन दिवाळीत वडिलांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. हा कुटुंबावर मोठा आघात होता. त्यामुळे सौरभही खचला होता. यामुळे सौरभचे हात सुन्न पडले होते. हात थरथर कापत असल्याने साधा पेन उचलणेही त्याला जमत नव्हते. डॉक्टरांनी त्याला वात झाल्याचे सांगितले. घरचा कर्ता पुरुष गेल्यामुळे आर्थिक गरजेसाठी आई अन्नपूर्णा यांनी दु:ख बाजूला ठेवून कंपनीत काम सुरू केले. यावेळी सौरभच्या आजारावर उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र मनातून उदास झाल्याने अभ्यासावर परिणाम झाला होता. अशावेळी भाऊ अजयने त्याला मानसिक आधार दिला. तो पुन्हा जिद्दीने अभ्यासाला लागला. हातांचा आजार मात्र पूर्णपणे बरा झाला नव्हता. अशा अवस्थेतही त्याने दहावीची परीक्षा दिली आणि ८२ टक्के गुणांनी उत्तीर्ण झाला. आयुष्यात लहानमोठे दु:ख मनावर खोलवर आघात करीत असतात. मात्र त्यातून स्वत:ला सावरून उभे राहणारेच यशस्वी होतात.

टॅग्स :SSC Results 2018दहावी निकाल २०१८nagpurनागपूर