शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामाार्गावर संसर्गाचा बिनधास्त प्रवास?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:09 IST

शरद मिरे भिवापूर: काहीशी खंडित झालेली संसर्गाची साखळी दिवाळीनंतर पुन्हा जुळताना दिसत आहे. संसर्ग वाढतोय. रुग्णही आढळत आहे. शासनाने ...

शरद मिरे

भिवापूर: काहीशी खंडित झालेली संसर्गाची साखळी दिवाळीनंतर पुन्हा जुळताना दिसत आहे. संसर्ग वाढतोय. रुग्णही आढळत आहे. शासनाने त्यासाठी नव्या मार्गदर्शक सूचनाही आखल्या आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळात बाहेर जिल्ह्यातून आवागमन करणाऱ्या प्रवाशांची होणारी तपासणी आता मात्र होताना दिसत नाही. त्यामुळे शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय मार्गावरून प्रवाशांसह आता संसर्ग सुद्धा बिनधास्त प्रवास करत असल्याचे चित्र आहे. मास्क, थर्मल टेस्ट, पथक, तपासणी नाका पूर्णता गायब आहे. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेला भिवापूर तालुका हा भंडारा, चंद्रपूर, वर्धा या तीन जिल्ह्यांना खेटून असून पाच ते दहा किमी अंतरानंतर त्यांच्या सीमा प्रारंभ होतात. त्यामुळे या तीन जिल्ह्यांसह गोंदिया, गडचिरोली व तेलंगाणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश अशी आंतरराज्यीय प्रवासी वाहतूक या राष्ट्रीय मार्गाने होते. कोरोनाचा शिरकाव होताच मार्च महिन्यात अवघा देश लॉकडाऊन झाला. राष्ट्रीय, राज्य व जिल्हा मार्गावर सीमाबंदी नाका उभारत प्रवाशांची थर्मल टेस्ट, मास्क आदीची तपासणी मोहीम २४ तास सक्रिय होती. जून महिन्यापासून लॉकडाऊन शिथिल होताच इतर बाबींसह हळूहळू सीमा बंदी नाके सुद्धा हटविण्यात आले. मात्र दिवाळीनंतर संसर्ग वाढीस असून तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशात प्रशासनाने फिजिकल डिस्टन्सिंगसह मास्कचा वापर बंधनकारक केला आहे. शहरात त्यादृष्टीने प्रशासनाकडून कठोर पावले उचलल्या जात असून कारवाईचे सत्र सुरू आहे. मात्र चंद्रपूर, भंडारा, वर्धा या बाहेर जिल्ह्यातून नागपूर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची स्थानिक राष्ट्रीय व राज्यमार्गावर कुठलीच तपासणी होतांना दिसत नाही. प्रवाशांच्या तपासणीसाठी नाका, पथक अशी कुठलीच यंत्रणा येथे तैनात नाही.

भिवापूर व सालेभट्टी (चोर) फाटा

लॉकडाऊनच्या काळात भिवापूर शहरातून जाणाऱ्या नागपूर-गडचिरोली राष्ट्रीय मार्गावर व सालेभट्टी (चोर) फाट्यावर जिल्हा सीमाबंदी नाके उभारून प्रवाशांची तपासणी केल्या गेली. आता मात्र या दोन्ही ठिकाणी कुठल्याही पध्दतीचे नाके अथवा तपासणी सुरू नाही. दोन्ही मार्गावरून बिनधास्त वाहतूक सुरू आहे.