युगच्या दोन्ही मारेकऱ्यांची फाशी कायम

By admin | Published: May 6, 2016 02:39 AM2016-05-06T02:39:30+5:302016-05-06T02:39:30+5:30

आईवडिलांना मुलांच्या सुरक्षेची चिंता करायला भाग पाडणाऱ्या व समाजात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या युग चांडक हत्याकांड प्रकरणातील दोन्ही नराधम आरोपींची फाशीची शिक्षा ...

The hanging of both the killers of the era remains hanging | युगच्या दोन्ही मारेकऱ्यांची फाशी कायम

युगच्या दोन्ही मारेकऱ्यांची फाशी कायम

Next

हायकोर्टाचा निर्वाळा : खंडणीसाठी अपहरण व हत्येचा गुन्हा सिद्ध
नागपूर : आईवडिलांना मुलांच्या सुरक्षेची चिंता करायला भाग पाडणाऱ्या व समाजात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या युग चांडक हत्याकांड प्रकरणातील दोन्ही नराधम आरोपींची फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व स्वप्ना जोशी यांनी गुरुवारी हा निर्वाळा दिला.
राजेश धन्नालाल दवारे (२२) व अरविंद अभिलाष सिंग (२६) अशी आरोपींची नावे असून राजेश कळमन्यातील वांजरी ले-आऊट, तर अरविंद जरीपटक्यातील प्रीती ले-आऊट येथील रहिवासी आहे. सत्र न्यायालयाने ४ फेब्रुवारी २०१६ रोजी दोन्ही आरोपींना भादंविच्या कलम ३६४ -अ (खंडणीसाठी अपहरण) अंतर्गत मरेपर्यंत फाशी, कलम ३०२ (हत्या) अंतर्गत मरेपर्यंत फाशी व कलम २०१ (पुरावे नष्ट करणे) अंतर्गत सात वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली होती. फाशीची शिक्षा कायम करण्यासाठी हे प्रकरण फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम ३६६ अनुसार उच्च न्यायालयात सादर करण्यात आले होते. तसेच, दोन्ही आरोपींनी त्यांच्या शिक्षेविरुद्ध अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाचे बच्ची सिंग, दीपक रॉय, धनंजय चॅटर्जी यासह विविध प्रकरणांतील निर्णय व या हत्याकांडातील विविध बाबी लक्षात घेता फाशीची शिक्षा कायम करून आरोपींचे अपील फेटाळून लावले. शासनाने परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी जोडून आरोपींविरुद्धचे गुन्हे संशयाशिवाय सिद्ध केल्याचा निष्कर्ष न्यायालयाने नोंदविला.

Web Title: The hanging of both the killers of the era remains hanging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.