'ज्ञानरथ'मुळे गावातच मुलांना एआय आणि कोडींगचे धडे; राज्यात पहिल्यांदाच धावणार 'एआय लॅब ऑन व्हील्स'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 16:29 IST2026-03-23T16:25:11+5:302026-03-23T16:29:20+5:30
Nagpur : २१ व्या शतकातील जागतिक अर्थव्यवस्था आता 'डेटा' आणि एआयच्या पायावर उभी आहे. अशा काळात तंत्रज्ञानाचे वरदान केवळ महानगरांपुरते मर्यादित न राहता ते ग्रामीण भागापर्यंत पोहोचावे, या जिद्दीतून नागपूर जिल्हा परिषदेने 'एआय लॅब ऑन व्हील्स' म्हणजेच 'ज्ञानरथ' हा क्रांतिकारी उपक्रम सुरू केला आहे.

'Gyanrath' provides AI and coding lessons to children in villages; 'AI Lab on Wheels' to run for the first time in the state
बालाजी देवर्जनकर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २१ व्या शतकातील जागतिक अर्थव्यवस्था आता 'डेटा' आणि एआयच्या पायावर उभी आहे. अशा काळात तंत्रज्ञानाचे वरदान केवळ महानगरांपुरते मर्यादित न राहता ते ग्रामीण भागापर्यंत पोहोचावे, या जिद्दीतून नागपूर जिल्हा परिषदेने 'एआय लॅब ऑन व्हील्स' म्हणजेच 'ज्ञानरथ' हा क्रांतिकारी उपक्रम सुरू केला आहे.
महाराष्ट्राच्या शैक्षणिक परिभाषेला पूर्णपणे 'रिबूट' करणारा हा पहिलाच प्रकल्प राज्यासाठी एक पथदर्शक 'डिजिटल मॉडेल' ठरणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते 'ज्ञानरथ'चे लोकार्पण नागपूर जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील १,५१२ शाळांपैकी बहुतांश शाळा दुर्गम भागात आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये उपजत बुद्धिमत्ता असूनही केवळ संसाधनांच्या अभावामुळे ते जागतिक स्पर्धेत मागे पडू नयेत, ही दूरदृष्टी ठेवून मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी या उपक्रमाची संकल्पना मांडून ती पूर्णत्त्वास आणली. नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर आयोजित 'महालक्ष्मी सरस' प्रदर्शनाच्या सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या क्रांतिकारी 'ज्ञानरथ'चे लोकार्पण झाले.
'एआय लॅब ऑन व्हील्स!'ची स्मार्ट वैशिष्ट्ये
अत्याधुनिक लॅब : ६ हाय-स्पीड वर्कस्टेशन्स, १ इंटरेक्टिव्ह स्मार्ट पॅनल बोर्ड.
नेक्स्ट-जेन टूल्स : प्रगत श्रीडी प्रिंटर आणि इमर्सिव्ह लर्निंगसाठी श्री व्ही. आर. सेट्स.
कौशल्य केंद्र: कोडिंग, रोबोटिक्स आणि एआय लैंग्वेजेसचा प्रत्यक्ष सराव.
तंत्रज्ञानाचे 'डेमोक्रॅटायझेशन'
'एआय लॅब ऑन व्हील्स! केवळ फिरता संगणक संच नाही, तर ते 'फ्युचरिस्टिक' शिक्षणाचे फिरते दालन आहे. या विशेष बसमध्ये बसवलेले गॅजेट्स कोणत्याही प्रगत कॉर्पोरेट आयटी लॅबशी सुसंगत आणि समांतर आहेत.
यामध्ये थ्रीडी प्रिंटर आहे, ज्याद्वारे मुले त्यांच्या कल्पनाशक्तीला प्रत्यक्ष आकार देऊ शकतील. व्हर्चुअल रिअॅलिटी (व्हीआर) सेट्सच्या माध्यमातून वर्गात बसूनच ते अंतराळ सफर किंवा समुद्राच्या तळाचा अभ्यास करू शकतील. कोडिंग किट्सच्या मदतीने लहान वयातच मुले 'अल्गोरिदम' आणि 'प्रोग्रामिंग'च्या भाषेत जगाशी संवाद साधतील. यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थी आता कोडिंग, रोबोटिक्स आणि एआय लँग्वेजेस शिकून प्रत्यक्ष सराव करू शकणार आहेत.