शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात गुटखाबंदी, पण सर्वत्र मिळतो गुटखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:21 IST

नागपूर : राज्यात २०१२ पासून गुटखाबंदी असतानाही ‘अन्न सुरक्षा मानदे कायदा’ पायदळी तुडवीत शहरातील प्रत्येक पानटपरीवर अवैधरीत्या खर्रा, गुटखा, ...

नागपूर : राज्यात २०१२ पासून गुटखाबंदी असतानाही ‘अन्न सुरक्षा मानदे कायदा’ पायदळी तुडवीत शहरातील प्रत्येक पानटपरीवर अवैधरीत्या खर्रा, गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूची राजरोसपणे सर्रास विक्री सुरू असल्याचे वास्तव सोमवारी सदर प्रतिनिधीने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये पुढे आले आहे.

शहरात प्रत्येक पानटपरीवर राजरोजसपणे गुटखा विकला जात असताना गुटखा विक्रेत्यांना अन्न व औषध प्रशासन विभागातील (एफडीए) अधिकाºयांचा आर्शीवाद तर नाही ना? असा प्रश्न आता सामान्य नागरिकांना पडला आहे. लॉकडाऊन आणि अनलॉकमध्ये पानटपºया बंद असल्या तरीही छुप्या मार्गाने शहरात अवैध गुटखा विक्री सुरूच आहे. या ठिकाणी पानविक्री करण्याऐवजी घातक तंबाखूचा खर्रा, गुटख्याच्या पुड्या, सुगंधित तंबाखू, पानमसाल्याची विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे तरुणाई व्यसनाधीन होत असून त्यांना कर्करोगासारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे.

अन्न व सुरक्षा मानदे कायदा २००६ विनियमन २०११ नुसार गुटखा विक्री करणे किंवा वितरण करणे गुन्हा ठरतो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्न व औषधी प्रशासन हा स्वतंत्र विभाग आहे. एफडीएच्या कार्यालय परिसराबाहेर आणि विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात सदर प्रतिनिधीने दोन वेगवेगळ्या कंपनीच्या ५० रुपयांच्या आठ गुटख्याच्या पुड्या आणि ५० रुपयांचा तंबाखूयुक्त खर्रा विकत घेतला. त्या ठिकाणी अन्य ग्राहकांना सहजरीत्या गुटखा आणि खर्रा उपलब्ध झाला.

मध्यप्रदेश व अन्य जिल्ह्यातून येतो गुटखा

गुटखा व सुगंधित तंबाखू मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि अन्य जिल्ह्यातून शहरात दाखल होतो आणि तस्करांच्या माध्यमातून पानटपºयांवर पोहोचतो. शहरात प्रत्येक पानटपरीवर मागेल त्यांना गुटखा मिळत असल्याचे सदर प्रतिनिधीला दिसून आले. गुटखा विक्रेत्यांवर एफडीएचे अधिकारी कारवाई करतातच पण पोलिसांनाही कारवाई करण्याचे अधिकार आहे.

नागपुरात सर्वत्र मिळतो गुटखा व खर्रा

नागपुरात गुटखा आणि खर्रा प्रचलित असून जवळपास २ हजारांपेक्षा लहानमोठ्या पानटपºया, किराणा दुकाने आणि घरी खर्रा तयार करून विक्री करणाºयांची संख्या आहेत. अनेकजण या व्यवसायावर उदरनिर्वाह करतात. मेडिकल चौक, धंतोली मेहाडिया, चौक, रेशिमबाग, महाल, बडकस चौक, इतवारी, मानेवाडा परिसर, बसस्टॅण्ड, विभागीय आयुक्त कार्यालय या भागात सर्रास गुटखा आणि तंबाखूयुक्त खºर्याची विक्री होत आहे. नागपुरात सहआयुक्त दर्जाचे अधिकारी असतानाही गुटखा विक्री करणाºया व्यावसायिकांवर त्यांचा धाक उरलेला नसल्याने या कायद्याची पायमल्ली होत आहे. अधिकारी काही ठिकाणी कारवाया करीत असल्याचे वास्तव आहे. पण वारंवार कारवाई न होण्यासाठी अपुरे कर्मचारी हेसुद्धा मुख्य कारण आहे.

आरोपींना कारावास

अन्न व औषध प्रशासन विभाग कारवाई करून प्रकरण न्यायायलात मांडतात. त्यावर सुनावणी होऊन आरोपींना शिक्षा झाल्याची अनेक प्रकरणे आहेत. पण या प्रकरणांमध्ये एक लाख रुपयांपर्यंत दंड आणि एक वर्ष शिक्षेची तरतूद आहे. अनेक प्रकरणे सहआयुक्त कार्यालयात सुनावणीनंतर दंडात्मक स्वरुपात कारवाई करून निकाली काढली जातात. अनेक ठिकाणी गुटखा जास्त प्रमाणात जप्त करण्यात येत असल्याने त्याच ठिकाणी सिलबंद करून ठेवला जातो.

जप्त साठा जाळला जातो

न्यायालयाच्या आदेशानंतर जप्त साठा उपलब्ध कारखान्याच्या फर्नेसमध्ये किंवा मनपाची परवानगी घेऊन डम्पिंग यार्डमध्ये गाडला जातो. पण एक वर्षाच्या काळात साठा जाळल्याचे किंवा जमिनीत गाडल्यात आलेला नाही. न्यायालयाची सुनावणी होईपर्यंत जप्त साठा त्याच प्रतिष्ठानात सिलबंद करून ठेवण्यात येतो. न्यायालयाच्या आदेशानंतरच पुढील कारवाई करण्यात येत असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.

विभागातर्फे गुटखा, खर्रा, सुगंधित तंबाखूची विक्री करणाºयांवर नियमित कारवाई करण्यात येते. अनेकदा मोठ्या कारवाईसाठी अन्य जिल्ह्यातील कर्मचारी बोलाविण्यात येतात. अशा कारवाया वारंवार राबविण्यात आल्या आहेत. विक्रेत्यांमध्ये धाक बसेल अशी कारवाई असते. अनेकदा पानटपºयांनाही सील् करण्यात आल्या आहेत.

शरद कोलते, सहायक आयुक्त, अन्न व औषधी प्रशासन विभाग.

गेल्या पाच वर्षांत खर्रा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने तोंडाच्या कॅन्सरच्या रुग्णात प्रचंड वाढ झाली आहे. सर्वाधिक रूग्ण विदर्भात आढळून येत आहेत. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने तोंडाचा ८० टक्के कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे तरुणाईने या घातक पदार्थांचे सेवन करू नये.

सुशील मानधनिया, कॅन्सर तज्ज्ञ.

अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे कारवाईचा तक्ता :

१ एप्रिल ते १५ नोव्हेंबर २०२० पर्यंत कारवाई

जिल्ह्याचे नाव तपासणी पेढ्यांची संख्या जप्ती प्रकरणे जप्त साठा किंमत एमआयआर दाखल खटले दाखल

नागपूर शहर ११ ११ २९,५०,०६१ लाख १० ८

नागपूर ग्रामीण १५ १५ ५,९५,९१८ लाख १५ ५