शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधरांच्या निवडणुकीत गुरुजीच अधिक सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:12 IST

नागपूर : पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत प्रत्येक पदवीधारकाला मतदान करण्याचा अधिकार आहे. पण यात शिक्षकांचा रोल सर्वात महत्त्वाचा आहे. ...

नागपूर : पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत प्रत्येक पदवीधारकाला मतदान करण्याचा अधिकार आहे. पण यात शिक्षकांचा रोल सर्वात महत्त्वाचा आहे. निवडणुकीत मतदाराच्या नोंदणीपासून उमेदवाराच्या प्रचाराचाही केंद्रबिंदू शिक्षकच आहे. विशेष म्हणजे मतदानाच्या टक्केवारीतही शिक्षण क्षेत्रातील मतदारांची टक्केवारी ९० टक्क्याहून अधिक आहे. त्यामुळे ज्या उमेदवाराच्या पाठीशी जास्तीत जास्त शिक्षक उभे असतील, तोच उमेदवार विधान परिषदेचे प्रतिनिधित्व करणार आहे.

पदवीधर मतदार संघाचे नेतृत्व करणाऱ्या आमदारापुढे परिषदेत मांडावयाच्या प्रश्नांमध्ये सर्वाधिक प्रश्न शिक्षकांचे असतात. पदवीधरांचा बेरोजगारी हा प्रश्न सोडला तर उर्वरित विषय शिक्षकांच्या समस्यांच्या बाबतीत असतात. त्यामुळे शिक्षक मतदार संघाबरोबरच पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका शिक्षकांसाठी महत्त्वाच्या असतात. मतदार संघात आता राजकीय पक्ष उमेदवार देत असले तरी, उमेदवारांच्या प्रचाराचा टार्गेट हा शिक्षकच असतो. यंदाच्या निवडणुकीत नवीन मतदार नोंदणी करण्यात आली. या मतदार नोंदणीत राजकीय पक्षाच्या पॅरेंट्स संघटनांपेक्षा सर्वाधिक आघाडीवर राजकीय पक्षांचे शिक्षक सेल आघाडीवर होते. शाळा, कॉलेजमध्ये मतदार नोंदणीचे कार्यक्रम चालले. उमेदवारांचा प्रचारही शाळा, कॉलेजमध्येच बघायला मिळाला. राजकीय पक्षानेही निवडणुकीची धुरा शिक्षक सेल, शिक्षक संघ यांच्यावरच सोपविली होती. मतदार नोंदणीपासून, मतदारांना घरातून काढण्यापर्यंतच्या कामात शिक्षकच अ‍ॅक्टिव्ह दिसले आणि मतदानातही शिक्षकांचीच आघाडी दिसून आली. त्यामुळे या निवडणुकीतील उमेदवाराचे भवितव्य शिक्षकांच्या भूमिकेवरून ठरणार आहे.

- मुळात पदवीधर मतदार संघ हा शिक्षकांच्या हक्काचा मतदार संघ आहे. आजपर्यंत या मतदार संघातून निवडून गेलेल्या आमदारांनी विधानसभेत प्रश्न मांडताना शिक्षकांच्या प्रश्नांना प्राथमिकता दिली आहे. निवडणुकीत एकगठ्ठा मतदार हे शाळा कॉलेजमध्येच असतात. त्यामुळे या निवडणुकीचा खरा फोकस शिक्षकच राहिला आहे.

अनिल शिवणकर, शिक्षक

- पदवीधर मतदार संघाचा मतदार हा पदवीधर असला तरी, पदवीधरांच्या समस्या मर्यादित आहेत. तुलनेत शिक्षकांच्या समस्या अमर्याद आहेत. त्यामुळे शिक्षकांनाच हा मतदार संघ आपल्या हक्काचा वाटत असल्याने शिक्षक खूप अ‍ॅक्टिव्हपणे काम करतात.

डॉ. जयंत जांभुळकर, शिक्षक

- इतर क्षेत्रात विखुरलेले पदवीधर ही निवडणूक गंभीरतेने घेत नाहीत. निवडणुकीत एकूण होणाऱ्या मतदानाची आकडेवारी लक्षात घेता ८० टक्के शिक्षकांचे मतदान असते. त्यामुळे शिक्षकच खऱ्या अर्थाने या निवडणुकीतील उमेदवारांचा तारणहार असतो.

योगेश बन, सेवानिवृत्त शिक्षक