आमगाव येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:06 IST2021-03-29T04:06:33+5:302021-03-29T04:06:33+5:30

उमरेड : तालुक्यातील आमगाव देवळी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना कोरोनाच्या परिस्थितीत कोणती आणि कशी काळजी घ्यावी, ...

Guidance to students at Amgaon | आमगाव येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

आमगाव येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

उमरेड : तालुक्यातील आमगाव देवळी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना कोरोनाच्या परिस्थितीत कोणती आणि कशी काळजी घ्यावी, यावर मार्गदर्शन करण्यात आले. वर्ल्ड व्हिजन एडीपी आमगाव क्लस्टरच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक वसंता पाटील, आरोग्य रक्षक के. टी. चंदनखेडे, आशावर्कर आशा नारनवरे, जे. डेव्हिड आदींची उपस्थिती होती. कोरोना संसर्गापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी उपाययोजनांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. हात धुणे, शरीराची निगा कशी राखावी आणि परिसराची स्वच्छता कशी ठेवावी, याबाबत विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन दिनेश वाईलकर यांनी केले. पल्लवी झिले हिने आभार मानले. जितेंद्र मोहाडीकर, मोहिनी बोहरूपी, रुद्रा खोडके, हसरी दुधेकर, आर्यन नारनवरे, दीक्षा रामटेके, संतोष पिल्लेवान, मनस्वी निकुळे आदींनी सहकार्य केले.

Web Title: Guidance to students at Amgaon